• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी

Rudra by Rudra
May 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
वालूज परिसरात ईद-उल-अजहा उत्साह, भक्ती आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरी
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

वालूज महानगर प्रतिनिधी : जाकिर शाह

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

वालूज महानगर परिसरात मुस्लिम समाजाचा पवित्र सण ईद-उल-अजहा (बकरी ईद) गुरुवारी अत्यंत उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि शांततेत साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नवीन व पारंपरिक पोशाख परिधान करून ईदगाह मैदान तसेच विविध मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

वालूज येथील मुख्य ईदगाह मैदानावर सकाळी हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाजपूर्वी धर्मगुरूंनी ईद-उल-अजहाचे महत्त्व, त्याग, बलिदान, मानवता आणि बंधुभाव याविषयी मार्गदर्शन केले. इस्लाम धर्म हा शांतता, प्रेम आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा धर्म असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नमाजनंतर देशात सुख, शांती, समृद्धी आणि भाईचारा कायम राहावा तसेच सर्व समाजात एकोपा निर्माण व्हावा यासाठी अल्लाह दरबारी विशेष सामूहिक प्रार्थना करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच विविध समाजातील नागरिकांनीही मुस्लिम समाजाला शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे दर्शन घडवले.

ईदच्या निमित्ताने परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक ठिकाणी गरीब व गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. समाजातील बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण वालूज परिसरात अत्यंत शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान वालूज पोलिसांनी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवत नागरिकांना मोठे सहकार्य केले. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतत सतर्क होते. मुस्लिम बांधवांसह सर्व नागरिकांनी वालूज पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

यावेळी परिसरातील समाजसेवक, धर्मगुरू, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Ad 1
Tags: Shah Ayyaub
Previous Post

ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण कदम यांचे निधन

Next Post

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

कोल्हापूरात जावयाला दिली चांदीची चप्पल.धोंड्याच्या महिन्यात जावयाच्या थाट…

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In