• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात
0
SHARES
34
VIEWS
Ad 1
Ad 1

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात
दहशतवादी कारवायांचा कट उधळण्याच्या तपासात मोठी कारवाई; चार राज्यांतील १२ ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम
वाळूज, प्रतिनिधी (जाकिर शाह) : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने देशात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याच्या कथित कटाचा तपास तीव्र करत शुक्रवारी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या चार राज्यांमध्ये व्यापक शोधमोहीम राबविली. या कारवाईत एकूण १२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसराचाही समावेश असून एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शुक्रवारी पहाटे एनआयएचे विशेष पथक अचानक वाळूज परिसरातील शिवाजीनगर भागात दाखल झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित घराला घेराव घालून सखोल तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एनआयएचे अधिकारी अनेक तास घरामध्ये तपास करत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चर्चेला उधाण आले होते.
तपासादरम्यान मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राइव्हसह विविध डिजिटल उपकरणे आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचे फॉरेन्सिक विश्लेषण करण्यात येणार असून त्यातून संशयिताच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि इतर हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
बनावट आधारकार्ड सापडल्याची माहिती

सूत्रांच्या माहितीनुसार, संशयिताजवळ काही बनावट आधारकार्ड आणि इतर ओळखपत्रे आढळून आली आहेत. तसेच मोबाईल तपासणीत परदेशातील काही व्यक्ती आणि संस्थांशी संपर्क तसेच आर्थिक व्यवहारांबाबत संशयास्पद माहिती मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या माहितीची पडताळणी एनआयएकडून सुरू असून तपासाच्या दृष्टीने त्याला महत्त्वाचे मानले जात आहे.
चार राज्यांत समन्वित छापेमारी
एनआयएने उत्तर प्रदेशातील पाच, राजस्थान आणि बिहारमधील प्रत्येकी दोन तसेच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम राबविली. या कारवाईत विविध कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. तपास यंत्रणा या सर्व साहित्याची बारकाईने छाननी करत आहेत.
स्थानिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
कारवाईदरम्यान वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच शहर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
दरम्यान, एनआयएच्या या कारवाईमुळे वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून तपासातून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
– जाकिर शाह, वाळूज प्रतिनिधी

Ad 1
Previous Post

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

Next Post

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपोडे गावात माकडांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In