• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या तेलसिंग पावराची मुंबईत सुरक्षा रक्षक पदी निवड
0
SHARES
861
VIEWS
Ad 1
Ad 1

अक्राणी प्रतिनिधी,
, ता. 30 : “पैशावाल्यांचीच पोरं मोठी होतात” हा समाजाचा समज तेलसिंग थावऱ्या पावराने आपल्या जिद्दीने खोटा ठरवला आहे. अतिदुर्गम सावऱ्यादिगर येथे जन्मलेल्या आणि सरदार सरोवरामुळे सावऱ्यादिगरहून शहादा तालुक्यातील जीवननगर येथे पुनर्वसित झालेल्या तेलसिंगने मुंबईत सुरक्षा रक्षक पदाची नोकरी मिळवली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

अत्यंत गरीब परिस्थितीत वडील थावऱ्या सोन्या पावरा व आई बुदीबाई यांनी मोलमजुरी करून, स्वतः अर्धपोटी राहून तेलसिंगला नर्मदा जीवन शाळा, जीवननगर येथेच शिकवले. फाटकी चप्पल, गळक्या छपराखाली कंदिलाच्या उजेडात त्याने शिक्षण पूर्ण केले.
या संघर्षात कणा बनून उभे राहिले ते मामा सुरतान पावरा. घरात आर्थिक चणचण असताना, शाळेची फी भरण्यापासून ते पुस्तके, वह्या घेऊन देण्यापर्यंत मामांनी वेळोवेळी पदरमोड केली.

“भाच्या, तू फक्त अभ्यास कर, पैशाची काळजी करू नकोस”, या एका वाक्याने तेलसिंगला बळ मिळाले. आई-वडिलांइतकाच मामा सुरतान पावरांचा मोलाचा वाटा या यशात आहे. गरिबीच्या वणव्यातही आई-वडील व मामांनी खचू न देता तेलसिंगला शिकवलं.निवडीची बातमी येताच जीवननगर येथील घरी थावऱ्या पावरा उंबरठ्यावरच हमसून रडले. बुदीबाईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले. तेलसिंगने सर्वात आधी मामा सुरतानला फोन लावून कृतज्ञता व्यक्त केली. बातमी ऐकून मामांचेही डोळे पाणावले.
तेलसिंगची खाकी वर्दी पैशाने नाही, तर आई-बापाच्या घामाने, मामा सुरतान यांच्या नि:स्वार्थ मायेने आणि स्वतःच्या अभ्यासाने मिळवलेली आहे. आई-वडील व मामा सुरतान पावरा यांना सॅल्यूट देताना तेलसिंगचे डोळे भरून आले. “गरिबांच्या पोरांना नोकरी लागत नाही, हे खोटं आहे. अभ्यास करा, जिद्द सोडू नका”, हा संदेश त्याने समाजाला दिला आहे.

Ad 1
Previous Post

शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; जीपने चिरडण्याचा प्रयत्न

Next Post

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

एनआयएची देशभर धाड; वाळूजमधील संशयित ताब्यात

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In