• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हिंदवी स्वराज्यसंकल्पक, सरलष्कर महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळावर भव्य मेघडंबरी उभारली..!

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
हिंदवी स्वराज्यसंकल्पक, सरलष्कर महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळावर भव्य मेघडंबरी उभारली..!
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण. हिंदवी स्वराज्यसंकल्पक, सरलष्कर महाराज शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळावर भव्य मेघडंबरी उभारली..!
कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यात होदिगेरे येथे असलेल्या श्रीमंत छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळावर अखेर भव्य मेघडंबरी उभारण्यात आली असून शिवभक्तांसाठी हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण मानला जात आहे. विशेष म्हणजे, हे महत्त्वपूर्ण कार्य पुण्यातील मल्हार भक्त आणि इतिहासप्रेमी डॉ.गौरव भाऊ घोडे यांच्या पुढाकारातून पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे पुणेकरांसाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

श्रीमंत स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील असून स्वराज्याच्या पायाभरणीत त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र त्यांच्या समाधीस्थळाची अवस्था अनेक वर्षे अत्यंत दयनीय होती. समाधीवर कोणतेही संरक्षणात्मक छत नसल्याने ऊन, वारा आणि पावसाचा थेट मारा सहन करावा लागत होता. शिवभक्तांकडून अनेकदा संवर्धनाची मागणी करण्यात आली होती. कर्नाटक सरकारकडून आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात ठोस कार्यवाही होत नसल्याची खंत शिवप्रेमींमध्ये होती.
ही बाब लक्षात घेऊन श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गौरव भाऊ घोडे यांनी पुढाकार घेत समाधीवर स्वखर्चाने भव्य मेघडंबरी उभारण्याचा संकल्प केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामसाहेब रेपाळे यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास आले

असल्याची माहिती आयोजकांनी दिली. रविवार, २४ मे २०२६ रोजी सुमारे साडेचार लाख रुपये स्वखर्च करून तब्बल ४५० किलो वजनाची मजबूत आणि आकर्षक मेघडंबरी समाधीवर बसविण्यात आली. हे संपूर्ण काम ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मावळ्यांच्या सहकार्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. प्रसाद चव्हाण, आकाश चव्हाण, काशिनाथ ओझरकर, महावीर पाटोळे, सुनील ढवळे आणि अविनाश कदम यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
विशेष म्हणजे, हे काम अवघ्या एका रात्रीत गनिमी काव्याच्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले. कामादरम्यान अनेक तांत्रिक अडचणी, वाहतुकीची समस्या आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. मात्र छत्रपतींच्या प्रेरणेने आणि शिवभक्तांच्या जिद्दीमुळे हे ऐतिहासिक कार्य यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची भावना सहभागी मावळ्यांनी व्यक्त केली.शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

पिंपरी-चिंचवड शहर अखिल वारकरी सेवा संघाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. मारुती महाराज शेजाळ यांची निवड

Next Post

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून आमरण उपोषण

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून आमरण उपोषण

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In