विक्रमगडमध्ये शिवसेनेच्या पक्षबांधणीला वेग; संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक
जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती; विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा
पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख श्री. पांडुरंग पाटील यांनी विक्रमगड येथे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख संजय उगवले यांच्या निवासस्थानी भेट देत आगामी राजकीय घडामोडींवर महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या बैठकीत येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, गावपातळीवर शिवसेनेची ताकद वाढवणे तसेच विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून संघटन विस्तारावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीदरम्यान तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या प्रसंगी रवींद्र भोईर, समन्वयक शिवसेना प्रणित अनुसूचित जाती, विक्रमगड विधानसभा तसेच सुरेश पष्टे आणि विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पक्षवाढ, जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील प्रश्नांवर आपली मते मांडली.
बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून आगामी निवडणुकांसाठी शिवसेना संघटन एज्ज होत असल्याचे संकेत या चर्चेतून मिळाले..
लेखन संकलन – शरद दिवे











