• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोवंशीय जनावराची अवैध कत्तल; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६० किलो गोमांस जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
गोवंशीय जनावराची अवैध कत्तल; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६० किलो गोमांस जप्त
0
SHARES
236
VIEWS
Ad 1
Ad 1

काळी दौ | प्रतिनिधी

पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी दौ येथे गोवंशीय जनावराची अवैध कत्तल करून मांस कापले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळी दौ येथील एका घरात गोवंशीय जनावराची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुसद ग्रामीण पोलिसांनी तातडीने छापा टाकला. या कारवाईदरम्यान चार जण गोवंशीय जनावराचे मांस कापताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ६० किलो गोमांस जप्त केले असून त्याची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

याशिवाय कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले. यात कुऱ्हाड, सुरे, इलेक्ट्रिक काटा तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी मिर्झा अनस बेग, फरातुल्ला बेग मिर्झा, सुजात बेग जाकी बेग (रा. काळी दौ) तसेच मिर्झा मुजीब खाजा बेग (रा. वसनगर, पुसद) यांना ताब्यात घेतले आहे. संबंधित आरोपी गोवंशीय जनावराचे मांस कापत असताना आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध लागू कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई पार पाडली.

या मोहिमेत ठाणेदार आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राहुल देशमुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल हनुमान गंगासागर, पोलीस नाईक नितीन आडे, पोलीस कर्मचारी उत्तम चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे ही कारवाई यशस्वी ठरली.

या प्रकरणाचा पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करीत असून अवैध कत्तल प्रकरणामागील इतर बाबींचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Ad 1
Previous Post

उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

आष्टी तालुक्यात मनरेगाच्या कामांमध्ये अनागोंदी?; मजूर नसताना मस्टरवर हजेरी कशी, मनसेचा संतप्त सवाल

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
11
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
आष्टी तालुक्यात मनरेगाच्या कामांमध्ये अनागोंदी?; मजूर नसताना मस्टरवर हजेरी कशी, मनसेचा संतप्त सवाल

आष्टी तालुक्यात मनरेगाच्या कामांमध्ये अनागोंदी?; मजूर नसताना मस्टरवर हजेरी कशी, मनसेचा संतप्त सवाल

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In