• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

मुंबई (कांदिवली पश्चिम) | प्रतिनिधी :

उत्तर मुंबई धनगर समाज समितीच्या वतीने लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती उत्सवात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष निलेश मोटे यांनी केले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

समितीच्या वतीने सकाळी १० वाजता कांदिवली पश्चिम येथील श्री रविशंकर शाळेसमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता बोरिवली देवीपाडा ते कुलूपवाडी मार्गे श्री रविशंकर शाळेपर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

सायंकाळी ७ वाजता श्री रविशंकर शाळेसमोर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात येणार आहेत. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करणार आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मानवतावादी, लोकहितवादी आणि कुशल प्रशासक म्हणून संपूर्ण देशात आदराने स्मरण केल्या जातात. त्यांच्या न्यायप्रिय कारभारामुळे आणि जनकल्याणकारी कार्यामुळे त्या भारतीय इतिहासातील एक आदर्श शासक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

उत्तर मुंबई धनगर समाज समितीच्या वतीने आयोजित या जयंती उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कांदिवली विभागातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी देखील समाजबांधवांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

धनगर समाजाच्या एकात्मतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा हा जयंती उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार असून समाजबांधवांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ad 1
Tags: Bharat kavitake
Previous Post

यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

Next Post

गोवंशीय जनावराची अवैध कत्तल; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६० किलो गोमांस जप्त

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
11
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
गोवंशीय जनावराची अवैध कत्तल; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६० किलो गोमांस जप्त

गोवंशीय जनावराची अवैध कत्तल; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६० किलो गोमांस जप्त

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In