• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवडमधील छत्रपती शिवाजी मार्केट आवारातील बेवारस मोटार लोणी काळभोरची; पोलिसांकडून मालकाचा शोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी

सासवड येथील नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या गजबजलेल्या आवारात गेल्या जवळपास १८ ते २० दिवसांपासून उभी असलेली बेवारस चारचाकी गाडी अखेर लोणी काळभोर परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, इकोस्पोर्ट प्रकारातील ही चारचाकी गाडी रविवारी, दि. १० मेपासून मार्केट परिसरात एकाच ठिकाणी उभी होती. अनेक दिवसांपासून गाडी हलविण्यात आली नसल्याने तसेच तिचा मालक कोण याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

मार्केट परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी बेवारस अवस्थेत वाहन उभे असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे या वाहनाबाबत तातडीने चौकशी करण्याची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात आली होती.

याबाबत स्थानिक व्यापारी अविनाश महाजन तसेच निरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची माहिती तपासून मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

प्राथमिक चौकशीत संबंधित इकोस्पोर्ट वाहन हे लोणी काळभोर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहन मालकाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.

सासवड पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाची संपूर्ण माहिती पडताळून पाहिली जात असून ते मार्केट परिसरात इतक्या दिवसांपासून का उभे आहे, याचाही शोध घेतला जात आहे. वाहन मालकाची ओळख आणि त्यामागील कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तत्परतेमुळे या बेवारस वाहनाबाबतचे गूढ काही प्रमाणात उलगडले असून, वाहन मालकाचा शोध पूर्ण होण्याकडे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Purandar Gaikwad
Previous Post

कळंबोलीत महापालिकेचा अनधिकृत झोपड्यांवर हातोडा; ३३ झोपड्या जमीनदोस्त

Next Post

स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप

स्वातंत्रवीर सावरकर जयंतीनिमित्त पेशवा प्रतिष्ठानतर्फे बिनव्याजी शैक्षणिक मदतीचे वाटप

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In