• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड रस्त्याच्या कामाची आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड रस्त्याच्या कामाची आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

भोर | प्रतिनिधी :

भोर तालुक्यासह कोकणाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड रस्त्याच्या कामाची आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली. या महामार्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर भोर पंचायत समितीच्या सभागृहात शेतकरी बांधव, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या, जमीन संपादनाशी संबंधित मुद्दे तसेच कामाच्या गतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार मांडेकर यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील अडथळे दूर करून कामाला गती देण्यावर भर दिला. रस्त्याचे काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.

या रस्त्यामुळे भोर, वरंधा घाट आणि महाड या भागांतील वाहतूक अधिक सुलभ होणार असून पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रकल्पातील अडथळे लवकरात लवकर दूर करून काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.

यावेळी विकास खरात, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सभापती मनिषाताई कंक, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपसभापती विशाल कोंडे, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष घोरपडे, NHAI चे उपअभियंता कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कृणाल धुमाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करत संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे आश्वासन दिले.

या पाहणी दौऱ्यामुळे रस्ते प्रकल्पातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मदत होणार असून शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड या महत्त्वाच्या मार्गाच्या कामाला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Narendra Yadav
Previous Post

बांधकरवाडी परिसराची नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर लवकर उपाययोजनांचे आश्वासन

Next Post

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रसुलशाह यांची निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रसुलशाह यांची निवड

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रसुलशाह यांची निवड

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In