• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रसुलशाह यांची निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रसुलशाह यांची निवड
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

अमरावती | प्रतिनिधी

आयटकशी संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण सभा शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी नमुना ४ परिसरातील सुदामकाका देशमुख स्मृतिभवन येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बळकटीकरण, कर्मचारी हिताचे विविध प्रश्न तसेच आगामी आंदोलनाच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

बैठकीदरम्यान राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि सेवा विषयक मागण्यांवर चर्चा करण्यात आली. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची फेररचना करण्यात आली असून कॉ. रसुलशाह बिसमिल्ला शहा यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या अमरावती जिल्हा महासंघाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत करत अभिनंदन केले.

बैठकीत येत्या ८ जूनपासून नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयासमोर होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनात अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर कॉ. रसुलशाह यांनी संघटनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. कर्मचारी हिताच्या सर्व प्रश्नांवर संघटना ठामपणे भूमिका घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सभेला महासंघाचे जिल्हा सचिव निळकंठ ढोके, संदीप तिंतुरकर, सागर दुर्योधन, अक्षय गावंडे, राहुल बोडखे, गणेश निंबर्ते, किशोर दुतोंडे, तुळशीदास लाड, मुकुंद बनसोड, विलास कोरडे, काल्या तोटे, योगेश तायडे, सिद्धार्थ गोंडाणे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सभेच्या शेवटी संघटनात्मक एकजूट अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटितपणे संघर्ष सुरू ठेवण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: Maroti Kalelar
Previous Post

शिंदेवाडी-भोर-वरंधा ते महाड रस्त्याच्या कामाची आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

Next Post

32 वर्षांची गौरवशाली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण; मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सरांचा भावपूर्ण सत्कार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
32 वर्षांची गौरवशाली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण; मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सरांचा भावपूर्ण सत्कार

32 वर्षांची गौरवशाली शैक्षणिक कारकीर्द पूर्ण; मुख्याध्यापक सुभाष कोळेकर सरांचा भावपूर्ण सत्कार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In