• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांत तीन मकोका कारवाया

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कठोर पावले उचलत गेल्या तीन महिन्यांत तब्बल तीन गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या धडक मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा शहर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत टोळीप्रमुख आयुष पुरुषोत्तम बावरे याच्यासह त्याचे साथीदार आकाश उर्फ डुडू पुरुषोत्तम परडेकर, कोहिनूर संजय उके आणि सौरभ उर्फ लल्ला राजेश यादव यांच्याविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस तपासानुसार संबंधित टोळी अनेक वर्षांपासून शहर परिसरात सक्रिय असून मारहाण, खंडणी उकळणे, दहशत निर्माण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यामध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

याचबरोबर दुसऱ्या एका प्रकरणात टोळीप्रमुख आसिफ उर्फ मोट्या शौकत अली शेखयात आणि त्याचा साथीदार नोशाद अली शौकत अली शेखयात यांच्याविरुद्धही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक फायद्यासाठी दहशत निर्माण करणे, जबरदस्तीने पैसे उकळणे, मारहाण करणे, धमक्या देणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी संबंधित आरोपींचा गुन्हेगारी इतिहास, पूर्वी दाखल असलेले गुन्हे आणि उपलब्ध पुरावे यांचा सखोल अभ्यास करून मकोका प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

वर्धा शहर पोलिसांच्या या सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे या कारवाईतून दिसून येते.

पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील मोहिमेला अधिक गती देण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया भविष्यातही सुरू राहतील, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

Next Post

खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

खेडाळू विद्यार्थिनींना निर्माण सोशल फोरमचा मदतीचा हात; आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी नेपाळ गाठण्याचे स्वप्न साकार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In