• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in Blog
0
कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील गारपीट गावाला भेट देत रात्रीचा मुक्काम केला. यावेळी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून विविध समस्यांची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

RelatedPosts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच तहसीलदार अनिल निनावे, अप्पर तहसीलदार नेहा मावस्कर, गटविकास अधिकारी अरुण इंगळे, विस्तार अधिकारी वानखेडे, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी ७.३० वाजता झालेल्या ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था, वीजपुरवठा, स्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

गढूळ पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश

गावात सध्या गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्याची मागणी केली. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले.

बंद पथदिवे सुरू करण्याचे आदेश

ग्रामस्थांनी गावातील अनेक रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याची तक्रार केली. तसेच तेंदूपत्ता बोनस अद्याप मिळालेला नसल्याचेही निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विद्युत विभागाला बंद पथदिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले, तर इतर तक्रारींबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

घरकुल लाभार्थ्याला चावी सुपूर्द

यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते घरकुल योजनेचे लाभार्थी राठोड यांना त्यांच्या नव्या घराची चावी सुपूर्द करण्यात आली. तसेच त्यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला. यामुळे लाभार्थी कुटुंबाने समाधान व्यक्त केले.

बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर

ग्रामसंवादादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील बेरोजगारी आणि आरोग्य सुविधांचाही आढावा घेतला. बेरोजगार युवकांना त्यांच्या कौशल्यांनुसार रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

शासन योजनांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन

ग्रामस्थांनी शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ घ्यावा, रोजगार निर्मिती, स्वच्छता, ग्रामविकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी यावेळी केले.

ग्रामीण भागातील समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या गावभेटीचे ग्रामस्थांनी स्वागत केले. प्रशासन गावपातळीवर येऊन लोकांशी संवाद साधत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

सांवगी मेघे पोलिसांची दमदार कारवाई; २.८५ लाख रुपयांचे २,७३० लिटर डिझेल-पेट्रोल जप्त

Next Post

वर्धा शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांत तीन मकोका कारवाया

Related Posts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
9
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान
Blog

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
11
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
Blog

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
52
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!
Blog

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
0
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला
Blog

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026
11
Blog

आचार्य टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 31, 2026
21
Next Post

वर्धा शहरात संघटित गुन्हेगारीविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; तीन महिन्यांत तीन मकोका कारवाया

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In