• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गृहिणी ते ‘उरूण-ईश्वरपूर बिझनेस फोरम’च्या उपाध्यक्ष: सौ. सुप्रिया पेठकर यांच्या कर्तृत्वाचा गौरव!

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
गृहिणी ते ‘उरूण-ईश्वरपूर बिझनेस फोरम’च्या उपाध्यक्ष: सौ. सुप्रिया पेठकर यांच्या कर्तृत्वाचा गौरव!
0
SHARES
116
VIEWS
Ad 1
Ad 1

ईश्वरपूर :
एका सामान्य गृहिणीपासून यशस्वी उद्योजिका आणि आता ‘उरूण-ईश्वरपूर बिझनेस फोरम’ (IBF) च्या उपाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास… हा थक्क करणारा प्रवास आहे सौ. सुप्रिया अवधूत पेठकर यांचा! त्यांच्या याच जिद्दीची आणि समाजकार्याची दखल घेत, २०२६ ते २०२८ या कार्यकाळासाठी त्यांची आयबीएफच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

शून्यातून विश्व निर्मितीचा प्रवास
२००५ मध्ये विवाहाची जबाबदारी आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सौ. सुप्रिया यांनी खऱ्या अर्थाने आपल्या स्वप्नांना पंख दिले. सासूबाई सौ. तेजादेवी पेठकर यांच्याकडून टेलरिंगचे धडे गिरवत त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. पती अवधूत पेठकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे त्यांनी २००७ नंतर ‘क्वालिटी टेलरिंग’ या व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली. आज त्यांच्या ‘क्वालिटी टेलरिंग अँड फॅशन’ या संस्थेची व्याप्ती परदेशापर्यंत पोहोचली असून, अनेक हातांना त्यांनी रोजगार मिळवून दिला आहे.
तसेच त्या अनेक सामाजिक कार्यक्षेत्र मध्ये अग्रेसर असतात. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, आणि मुळात त्या स्वतः गायक आहेत.
त्यांना सामाजिक वारसा आणि नेतृत्वाचा ठसा
कै. प्रकाश गजानन पेठकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचे व्रत सौ. सुप्रिया यांनी २०१५ पासून स्वीकारले. २०२० ते २०२४ या काळात राष्ट्रवादी युवती संघटनेच्या उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी महाविद्यालयीन युवतींच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे कार्य केले.

आय.बी.एफ.मध्ये महिलांना नवी दिशा
२०२१ मध्ये मा. प्रतीक (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयबीएफमध्ये प्रवेश केल्यानंतर, सौ. सुप्रिया यांनी महिला उद्योजिकांच्या संघटन उभारणीवर लक्ष केंद्रित केले. जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्याने शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेत आयबीएफने आता त्यांना उपाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
उद्योजिकांसाठी नवपर्वाचा आरंभ
आय.बी.एफ च्या नूतन कार्यकारिणीत शहाजी पाटील (अध्यक्ष), स्वरूप साळुंखे (उपाध्यक्ष) आणि सौ. सुप्रिया पेठकर (उपाध्यक्ष) यांची निवड झाली आहे. सौ. सुप्रिया यांच्या निवडीमुळे महिला उद्योजिकांना संघटनेत एक हक्काचा आणि प्रभावी आवाज मिळाला असून, त्यांच्या कार्यामुळे परिसरातील महिला उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
व्यवसाय, कुटुंब आणि समाजकार्य यांचा उत्तम समतोल साधणाऱ्या सौ. सुप्रिया पेठकर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Ad 1
Previous Post

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात रंगणार भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थेट सामना? अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीच्या चर्चांना वेग

Next Post

खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा आणि जनावरांचे मोठे नुकसान

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा आणि जनावरांचे मोठे नुकसान

खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा आणि जनावरांचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In