• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विखरणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची ३०१ वी जयंती व स्पोकन इंग्लिश क्लासचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विखरणी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची ३०१ वी जयंती व स्पोकन इंग्लिश क्लासचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
0
SHARES
111
VIEWS
Ad 1

विखरणी, ता. येवला | प्रतिनिधी

RelatedPosts

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, विखरणी येथे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. याच वेळी संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या स्पोकन इंग्लिश क्लासच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभही उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दुहेरी कार्यक्रमामुळे शाळा परिसरात आनंदाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहनजी शेलार सर होते. यावेळी संस्थेच्या सचिव ज्योती शेलार मॅडम, प्राचार्य भास्कर खेमनर सर, भीमराज आवारे सर, शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यामातांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला विनम्र आदरांजली वाहिली. यावेळी वक्त्यांनी अहिल्यामाता होळकर यांच्या न्यायप्रिय, लोककल्याणकारी, धर्मनिष्ठ आणि समाजहिताच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहनजी शेलार यांनी विद्यार्थ्यांना अहिल्यामातांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अहिल्यामाता होळकर यांनी आपल्या दूरदृष्टी, प्रशासन कौशल्य आणि लोकहिताच्या कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तसेच त्यांनी आधुनिक युगातील इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य विकसित करण्यासाठी स्पोकन इंग्लिशचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भास्कर खेमनर सर यांनी केले. त्यांनी संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीबरोबरच सर्वांगीsण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला.

स्पोकन इंग्लिश क्लासच्या विद्यार्थिनी रिया पगारे हिने प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण सूत्रसंचालन करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी स्पोकन इंग्लिश क्लासमधील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या अनुभवांची माहिती दिली. शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढल्याचे सांगत त्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आत्मविश्वास, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी भीमराज आवारे सर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या महान कार्याचा प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच स्पोकन इंग्लिश क्लासच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संस्मरणीय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.

Previous Post

खापरदेव हिवरा येथे वादळी वाऱ्यासह गारपीट; घरे, शेती, फळबागा आणि जनावरांचे मोठे नुकसान

Next Post

सीझर झालेल्या महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमितपणे करा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी २०२६’ प्रकल्पास शुभेच्छा

July 16, 2026
3
ताज्या घडामोडी

आकाश दुबैया हत्या प्रकरण : आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी; एसपींच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

July 16, 2026
3
ताज्या घडामोडी

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

July 16, 2026
49
ताज्या घडामोडी

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

July 16, 2026
26
ताज्या घडामोडी

सांगा… कसं जगावं? पाऊस पडेना अन् बियाणं उगवेना

July 15, 2026
10
ताज्या घडामोडी

उजनीतून तातडीने पाणी सोडा; शेतकऱ्यांना पूर्ववत आठ तास वीज द्या

July 15, 2026
14
Next Post
सीझर झालेल्या महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमितपणे करा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सीझर झालेल्या महिलांच्या कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमितपणे करा आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विशाल वाबळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांची निवड

July 16, 2026

जळकोटमध्ये दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू होण्याच्या हालचालींना वेग; जिल्हा न्यायाधीशांकडून प्रशासकीय इमारतीची पाहणी

July 16, 2026

लातूरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

July 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In