• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धाराशिव–बीड–लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख यांच्यात थेट लढत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
धाराशिव–बीड–लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख यांच्यात थेट लढत
0
SHARES
30
VIEWS
Ad 1
Ad 1

लोकनेते, माजी ग्रामविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमचे मार्गदर्शक आदरणीय मा. श्री. बसवराजजी पाटील साहेब यांना

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

तालुका /प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ
धाराशिव–बीड–लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल हार्दिक व मनःपूर्वक अभिनंदन!

साहेब, आपल्या दीर्घ राजकीय अनुभव, सक्षम नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यामुळे हा विजय निश्चितच आपल्या बाजूने येणार आहे, याबद्दल आम्हा सर्वांना पूर्ण विश्वास आहे. आपण नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करत आला आहात आणि पुढेही आपल्या नेतृत्वाखाली या विभागाचा सर्वांगीण विकास निश्चित घडेल, ही खात्री आहे.

*आपल्या या निवडणुकीत आपण प्रचंड मतांनी विजयी व्हावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!*

आपला विजय निश्चित आहे — विजय आपलाच आहे.आपले मनःपूर्वक

शुभेच्छुक,
मा. श्री. किशोर दादा पवार.(मुंबई)
1) RMSS युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र
राष्ट्रीय मोदी सेवा समिती,संगठन संपूर्ण भारत.(भाजपा)
जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान
केंद्र सरकार व राज्य सरकार

2. युवा प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य

माजीमंत्री बसवराज पाटील विरुद्ध युवक काँग्रेचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख अशी विधानपरिषदेची थेट लढत रंगणार …….. उमरगा तालुक्याला आता दोन आमदार लाभणार
उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक
स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत उमरगा तालुक्याला यंदा विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत कवठा जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य तथा युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमरगा तालुक्यातील दोन प्रभावी नेत्यांमध्ये थेट राजकीय संघर्ष रंगणार आहे.

बसवराज पाटील यांनी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ मंत्रीपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र अडीच वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर उमरगा तालुक्यातील काँग्रेस संघटनात्मकदृष्ट्या काहीशी कमकुवत झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अशा काळात महेश देशमुख यांनी पुढे येत पक्ष संघटनेला नवी ऊर्जा देण्याचे काम केले.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर सक्रिय भूमिका बजावत पक्षात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदाची तसेच ओडिशा राज्य प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारीही सोपवली आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवत स्थानिक पातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे.
आता काँग्रेसने बसवराज पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि मातब्बर नेत्याविरुद्ध युवा नेतृत्व म्हणून महेश देशमुख यांना उमेदवारी दिल्याने ही लढत अधिकच लक्षवेधी ठरणार आहे. एका बाजूला दीर्घ राजकीय अनुभव आणि दुसऱ्या बाजूला तरुण नेतृत्वाची ऊर्जा अशी ही सरळ दुरंगी लढत असल्याने उमरगा तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात या निवडणुकीकडे उत्सुकतेने पाहिले जाणार आहे.

दरम्यान, दोन्ही आघाड्यांनी उमरगा तालुक्यातील नेत्यांना संधी दिल्याने तालुक्याला विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांत प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिक राजकारणात हा मोठा बदल मानला जात आहे.दरम्यान सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे मोठया शक्तीप्रदशनाने दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

RMSS राष्ट्रीय मोदी सेवा समिती (भाजपा) तसेच लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने साहेबांना मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!

Ad 1
Tags: Ladlesab Nadaf
Previous Post

त्रिकोळी ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

बीड शहरातील समाजसेवेतील कोहिनूर हिरा तथा लोकशाही पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अशोक ढोले पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In