• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
डंपरच्या चाकाखाली चिरडून ५६ वर्षीय पेंटरचा जागीच मृत्यू; नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे संताप
0
SHARES
112
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी | दि. २ जून २०२६

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती येथे भरधाव आणि बेदरकारपणे धावणाऱ्या डंपरच्या धडकेत एका ५६ वर्षीय पेंटर व्यवसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मोहन जगन्नाथ माळवदकर (वय ५६, रा. गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे आहे. ते व्यवसायाने पेंटर होते.

अपघातानंतर धक्कादायक बाब समोर आली असून संबंधित डंपरच्या मागील बाजूस कोणतीही नंबर प्लेट नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहनाची ओळख पटविणे आणि चालकाचा शोध घेणे यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकारामुळे पोलिस आणि आरटीओ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अपघातप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

खडकवासला कालव्यात बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला; शोधमोहीमेदरम्यान महिलेचे प्राण वाचवले

Next Post

उदगीर रिंगरोडकडे नागरिकांच्या नजरा; ४०० कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

उदगीर रिंगरोडकडे नागरिकांच्या नजरा; ४०० कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार?

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In