• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
66
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत मटका जुगार, विनापरवाना देशी दारू विक्री आणि सुगंधित तंबाखू (मावा) विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण २० हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पहिल्या कारवाईत आलास (ता. शिरोळ) येथील जुगुळ रस्त्यावरील न्यू पॅलेस बिअर बारच्या परिसरात उघड्यावर पैसे घेऊन ‘कल्याण मटका’ जुगार चालवित असलेल्या रवि लिंगाप्पा चलवादी (वय ३९, रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून २ हजार ८३० रुपये रोख, मटक्याचे आकडे लिहिलेला कागद, बॉलपेन आणि १४ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १६ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत नवे दानवाड (ता. शिरोळ) येथील एसटी स्टँडच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ राजू श्रीमंत कांबळे (वय ३९, रा. बेरड गल्ली, दानवाड) हा विनापरवाना देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ‘रेठरे संत्रा’ कंपनीच्या देशी दारूच्या ६८ बाटल्या असा २ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील हॉटेल बॉर्डर धाबा परिसरातील ‘राधे पानशॉप’ येथे वैभव हंबीरराव पाटील (वय ३५, रा. शिरदवाड) हा सुगंधित तंबाखू मिश्रित मावा विक्री करताना आढळला. त्याच्याकडून ३० माव्याच्या पुड्या असा ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

Next Post

पंढरपूरची वारी : केवळ यात्रा नव्हे, तर भक्ती, समता आणि संस्कृतीचा महामेळा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

पंढरपूरची वारी : केवळ यात्रा नव्हे, तर भक्ती, समता आणि संस्कृतीचा महामेळा

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In