• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिरूरच्या महिला सक्षमीकरणासाठी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे यांचा मंत्रालयात पाठपुरावा; अंगणवाडी व ‘सखी वन स्टॉप सेंटर’साठी महत्त्वपूर्ण मागण्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
44
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे प्रतिनिधी

शिरूर शहरातील महिला व बालकांना न्याय, सुरक्षा, पोषण, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या अधिक सक्षम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच त्यांच्या विविध प्रश्नांचे शासनस्तरावर प्रभावी निराकरण व्हावे, या उद्देशाने शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनी आमदार ज्ञानेश्वर (माऊलीआबा) कटके यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची भेट घेऊन दोन महत्त्वपूर्ण निवेदने सादर केली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशीही शिरूर शहरातील महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा कलिम सय्यद, उपसभापती स्वप्नाली योगेश जामदार तसेच सामाजिक कार्यकर्त्या उषा वाखरे सहभागी झाल्या होत्या.

अंगणवाडी केंद्रांचे नियंत्रण नगरपरिषदेकडे देण्याची मागणी

महिला व बालविकास मंत्र्यांना सादर केलेल्या पहिल्या निवेदनात शिरूर शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे प्रशासकीय व व्यवस्थापकीय नियंत्रण शिरूर नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता अंगणवाड्यांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, इमारतींची देखभाल, पूर्वप्राथमिक शिक्षण व आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे स्थानिक स्तरावर राबविणे शक्य होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

महिला बचत गटांकडे पोषण आहाराची जबाबदारी देण्याची मागणी

अंगणवाड्यांमधील बालके, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना ताजा, पौष्टिक व दर्जेदार पोषण आहार वेळेत उपलब्ध व्हावा, यासाठी पोषण आहार तयार करण्याचे व वितरणाचे काम स्थानिक पात्र महिला बचत गटांकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली. यामुळे स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

‘सखी वन स्टॉप सेंटर’ प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी

दुसऱ्या निवेदनात केंद्र शासनाच्या ‘सखी वन स्टॉप सेंटर’ योजनेची शिरूर शहरात प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. या केंद्राद्वारे संकटग्रस्त महिलांना मानसिक समुपदेशन, कायदेशीर मदत, वैद्यकीय सहाय्य, तात्पुरता निवारा तसेच आपत्कालीन मदत उपलब्ध करून दिली जाते.

यासोबतच १८१ महिला हेल्पलाईन अनेकदा कार्यरत नसल्याची बाब मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देत ती तातडीने सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली.

महिलांच्या न्यायासाठी सातत्याने प्रयत्न

यावेळी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचर्णे म्हणाल्या, “शिरूरमधील प्रत्येक महिला आणि बालकाला न्याय, सुरक्षा, पोषण, शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी आमचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहील. आमदार ज्ञानेश्वर (माऊलीआबा) कटके यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला शासन स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

महिला आणि बालकांच्या हितासाठी शासन स्तरावर करण्यात आलेल्या या पाठपुराव्यामुळे शिरूर शहरातील अंगणवाडी व्यवस्थेची गुणवत्ता, महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Avinash Ghogare
Previous Post

सासऱ्याकडून जावयाची कुऱ्हाडीने हत्या; कौटुंबिक वादाचे रक्तरंजित पर्यवसान

Next Post

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; मटका, गावठी दारू व मावा विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हे

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In