फलटण : फलटण तालुक्याचे आमदार सचिनजी कांबळे पाटील तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
हा जनता दरबार महाराजा मंगल कार्यालय येथे होणार असून, नागरिकांना त्यांच्या विविध समस्या, प्रश्न व तक्रारी थेट मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
नागरिकांनी जनता दरबारात मांडावयाचे प्रश्न व तक्रारी दिनांक २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात जमा कराव्यात, असे आवाहन आमदार सचिन कांबळे पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या व तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.








