जळकोट : जळकोट नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्ष तथा जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ. प्रभावती चंद्रकांत कांबळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नगरपंचायतीचे सर्व सदस्य, पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष म्हणून सौ. प्रभावती कांबळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नगरपंचायतीच्या विकासकामांमध्ये त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरपंचायतीचे सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय कलवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नगराध्यक्ष सौ. प्रभावती कांबळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.








