• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 3, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
23
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी : सतीश नेवारे
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

दि. २ : जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी महाडीबीटी 2.0 या नव्या प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये अचूक माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

महाडीबीटी 2.0 पोर्टलद्वारे साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ९ वी ते १० वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (अनुसूचित जाती), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे परीक्षा फी/शिक्षण फी योजना, इयत्ता ५ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती तसेच माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनांचे अर्ज ऑनलाइन भरता येणार आहेत.

शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांकडून जमा करून त्यांची पडताळणी करावी. यामध्ये जात प्रमाणपत्र, बीपीएल दाखला, वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र तसेच संबंधित योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. कागदपत्रांची तपासणी करूनच पोर्टलवर माहिती काळजीपूर्वक भरावी, असे कार्यालयाने सूचित केले आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर शाळांनी नोंदणीसाठी mahadbt2.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. मागील वर्षी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या युजरनेमचाच वापर करावा. शाळेच्या युजरनेममध्ये ‘Principal’ ऐवजी संबंधित शाळेचा यू-डायस क्रमांक वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. आधार-संलग्न मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त झाल्यानंतर संकेतशब्द बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. जुन्या प्रोफाइलवर आधार क्रमांक अपडेट केलेल्या वापरकर्त्यांना ओटीपी प्राप्त होणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०० / १८००१०२५३९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच helpdesk@mahadbt.gov.in या ई-मेलवर संपर्क करता येणार आहे. तांत्रिक किंवा प्रशासकीय तक्रारींसाठी संबंधित लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Tags: Satish Neware
Previous Post

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

Next Post

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
98
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
189
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In