मराठवाड्याच्या पावन भूमीत भक्तीचा दिव्य सोहळा! श्री बाबाजींचे मूळगाव असलेल्या श्रीक्षेत्र दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी श्री बाबाजींचा ललित पंचमी जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
बाबाजींचे उत्तराधिकारी, अध्यात्म शिरोमणी जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या पावन उपस्थितीने या मंगलमय सोहळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.
भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात भाविकांनी श्री बाबाजींच्या जन्मोत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आणि श्री बाबाजींच्या चरणी भाविकांनी श्रद्धा व भक्तीभाव अर्पण केला..










