• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

पालवी हॉटेलजवळील पुलाचे बांधकाम; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाहतूक बदल लागू

सातारा | प्रतिनिधी

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

सातारा शहरातील गोडोली नाका परिसरातील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. लिंबखिंड–खिंडवाडी रस्त्यावरील पालवी हॉटेलजवळील लहान पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. या कामादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३४ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. हे बदल २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

हे मार्ग वाहतुकीसाठी बंद

सातारा शहरातून गोडोली नाका आणि शिवराज पेट्रोल पंपमार्गे कराड–कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना संबंधित रस्त्यावरून जाण्यास बंदी असेल. तसेच कराड–कोल्हापूर बाजूकडून शिवराज पेट्रोल पंपमार्गे गोडोली नाका ओलांडून सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावरून प्रवेश करता येणार नाही.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

१. कराड–कोल्हापूरकडून सातारा शहरात येणारी वाहने : अजंठा चौक मार्गे गोडोली नाक्यावरून शहरात प्रवेश करता येईल.

२. सातारा शहरातून कराड–कोल्हापूरकडे जाणारी वाहने : पोवई नाका–गोडोली नाका–अजंठा चौक या मार्गाचा वापर करावा.

३. स्थानिक रहिवाशांसाठी पर्याय : अवजड वाहने वगळता इतर वाहनांना अजंठा चौक–तलाठी कॉलनी–फॉरेस्ट कॉलनीमार्गे लिंबखिंड–खिंडवाडी रस्त्याचा वापर करता येईल.

४. दुसरा अंतर्गत पर्यायी मार्ग : अवजड वाहने वगळता इतर वाहनांसाठी गोडोली चौक–पालवी चौक–गोळीबार मैदान–जगदाळे बागमार्गे लिंबखिंड–खिंडवाडी रस्त्याचा पर्याय उपलब्ध असेल.

पुलाच्या बांधकामाच्या कालावधीत वाहनधारकांनी वाहतूक बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad 1
Tags: Swapnil Patil
Previous Post

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

Next Post

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
7
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
5
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
6
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
6
ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
Next Post

तळवडेतील ७३ तोळे सोन्याच्या लुटीचा आठ तासांत उलगडा; तिघांना अटक

ताज्या बातम्या

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In