नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा; भाविकांची मोठी उपस्थिती
सेलू | प्रतिनिधी
सेलू शहरातील विद्यानगर येथे जय अंबे नवरात्र महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी त्यांनी आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन देवीची आरती केली तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे अध्यक्ष अजय लोढा यांनी सांगितले की, नवरात्र महोत्सवानिमित्त देवीसमोर धार्मिक विधी, देवीचा विडा, भक्तिमय गीतांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच लहान मुलांसाठी विविध उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर शहाणे, सचिव शेख मोइब, कोषाध्यक्ष विनोद खाडे यांच्यासह एकता मित्र मंडळ व एकता गणेश मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. परिसरातील भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.









