• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिंचवडमध्ये श्री कालिका देवी मंदिराचा नवरात्रोत्सव उत्साहात!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

धार्मिक विधी, दांडिया-गरबा, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही मिळणार वाव

प्रतिनिधी :

RelatedPosts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

चिंचवड, पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील मोहननगर परिसरातील श्री कालिका देवी मंदिरात श्री कालिका देवी प्रसन्न व सौ. क्ष. कासार समाजसेवा मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान आयोजित या उत्सवात धार्मिक विधी, भजन, आरती, दांडिया-गरबा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात भक्तिमय व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

नवरात्रोत्सवाची सुरुवात ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आणि महाअभिषेकाने झाली. उत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी आरती, सायंकाळी भजन आणि रात्री दांडिया-गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यशाळा

उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन आणि ओरिगामी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, खाद्यपदार्थांचे स्टॉल, आनंद मेळावा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे उत्सवाचे आकर्षण ठरत आहेत.

१८ ऑक्टोबर रोजी पालखी नगरप्रदक्षिणा, होमहवन आणि सांस्कृतिक भवनाच्या शेडच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विजयादशमीनिमित्त २० ऑक्टोबर रोजी महाअभिषेक, आरती आणि शमीपूजन होणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा आणि देवीच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

२५ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कीर्तन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी श्री कालिका देवीच्या वाढदिवसानिमित्त विशेष पूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

धार्मिक परंपरांचे जतन करण्याबरोबरच समाजातील नागरिकांना एकत्र आणणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि सामाजिक सलोखा वाढविणे हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी आणि भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सवाबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानेश्वर साळवी (८२०८१ ४३५५२) किंवा सौ. चंचल लोखंडे (९०२१३३९६९०) यांच्याशी संपर्क साधावा.

आयोजक : श्री कालिका देवी प्रसन्न व सौ. क्ष. कासार समाजसेवा मंडळ, मोहननगर, चिंचवड.

Ad 1
Tags: Sachin Aamle
Previous Post

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

Next Post

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

Related Posts

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!
ताज्या घडामोडी

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026
4
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती
ताज्या घडामोडी

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रेणुकामातेची आरती

October 19, 2026
4
शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!
ताज्या घडामोडी

शिर्डीत श्री साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला उत्साहात सुरुवात!

October 19, 2026
5
आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड
ताज्या घडामोडी

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

October 19, 2026
4
तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!
ताज्या घडामोडी

तिखोरा येथील गोमाई नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला!

October 19, 2026
2
ताज्या घडामोडी

शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडांगणावरही कसबा हायस्कूलची बाजी!

October 19, 2026
6
Next Post
आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

आदेश बंडू वाणी यांची भाजप युवा मोर्चाच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हा सरचिटणीसपदी निवड

ताज्या बातम्या

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

शिवरीतील यमाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची भक्तिमय धूम!

October 19, 2026
आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

आदिवासींच्या नशिबी मृत्यूनंतरही हालअपेष्टा!

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In