• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माणगावच्या दुर्गेश डांगळे यांचे साहसी यश; गोरखगड ते आहुपे घाट सोलो रेंज ट्रेक यशस्वी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

दोन दिवसांत सहा किल्ले सर करण्याचा विक्रम नावावर; ४८ वी नाईट कॅम्पिंग मोहीम पूर्ण करताना सुरक्षेला दिले सर्वोच्च प्राधान्य

माणगाव/खोपवली : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील चन्नाट येथील साहसी गिर्यारोहक दुर्गेश डांगळे यांनी १७ आणि १८ ऑक्टोबरदरम्यान गोरखगड ते आहुपे घाट असा आव्हानात्मक सोलो रेंज ट्रेक यशस्वीपणे पूर्ण केला. दोन दिवसांत सहा किल्ले सर करण्याचा विक्रम नावावर असलेल्या दुर्गेश यांच्यासाठी ही मोहीम विशेष ठरली. त्यांचा हा पाचवा सोलो रेंज ट्रेक, तर सह्याद्रीच्या कुशीत केलेली ४८ वी नाईट कॅम्पिंग मोहीम होती.

RelatedPosts

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”

सारोळ्याच्या लेकीची इस्रोपर्यंत झेप; धनश्री काशिदला विमान प्रवासाची संधी!

या मोहिमेची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी खोपवलीमार्गे देहरी गावातून झाली. सुरक्षेच्या दृष्टीने गावातील स्थानिकांकडे नोंद करून दुर्गेश यांनी अवघ्या दीड तासात गोरखगड सर केला. त्यानंतर रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या ऐतिहासिक आहुपे घाटाच्या दुर्गम मार्गाने त्यांनी घनदाट जंगलातून सुमारे अडीच तास एकट्याने पायपीट केली.

या प्राचीन व्यापारी मार्गावर त्यांना जुन्या संस्कृतीचे अवशेष, दगडी पायऱ्या आणि पाण्याची दोन टाकी आढळली. या अवशेषांचे त्यांनी कॅमेऱ्यात चित्रीकरण केले. घाटमाथ्यावरील रिसॉर्टमध्ये नाश्ता केल्यानंतर त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी खेतोबा मंदिराजवळ तंबू उभारला. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांनी आपली ४८ वी नाईट कॅम्पिंग मोहीम पूर्ण केली.

मात्र, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपल्याने संपर्क साधणे आणि पुढील मार्ग शोधणे कठीण झाले. गायदरा, दमदम्या डोंगर आणि सिद्धगड असा पुढील रेंज ट्रेक करण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु, मोबाईल बंद असताना घनदाट जंगलात पुढे जाणे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात घेऊन त्यांनी खेतोबा मंदिराजवळच मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजगुरुनगरमार्गे एसटी बस आणि पुण्याहून रेल्वेने त्यांनी सुखरूप मुंबई गाठली.

साहसाबरोबरच सुरक्षिततेला प्राधान्य देत योग्य वेळी माघार घेण्याचा निर्णय दुर्गेश यांनी घेतला. आहुपे घाटातील दुर्मिळ अवशेषांचे दस्तऐवजीकरण केल्याने त्यांच्या मोहिमेला ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

या अनुभवातून दुर्गेश डांगळे यांनी गिर्यारोहकांना महत्त्वाचा संदेश दिला. “सह्याद्रीत सोलो ट्रेक करताना धाडस दाखवा; मात्र सुरक्षेला पहिले प्राधान्य द्या. फोन बंद झाल्यानंतर पुढे जाणे शक्य वाटले असते, पण तो निर्णय धोकादायक ठरला असता. वेळेवर घेतलेला योग्य निर्णयच तुम्हाला सुरक्षित घरी पोहोचवतो,” असे त्यांनी सांगितले.

Ad 1
Tags: Durgesh Dangle
Previous Post

शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”

Next Post

नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; सहा जण जखमी

Related Posts

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
ताज्या घडामोडी

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 23, 2026
4

1
सारोळ्याच्या लेकीची इस्रोपर्यंत झेप; धनश्री काशिदला विमान प्रवासाची संधी!
ताज्या घडामोडी

सारोळ्याच्या लेकीची इस्रोपर्यंत झेप; धनश्री काशिदला विमान प्रवासाची संधी!

October 23, 2026
0
ताज्या घडामोडी

करमाळ्यात बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन; ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

October 23, 2026
10
दख्खन धनगरवाडीत दसरा उत्साहात साजरा; धनगरी गजा, गरबा अन् बाळ्या डान्सने रंगला सोहळा!
ताज्या घडामोडी

दख्खन धनगरवाडीत दसरा उत्साहात साजरा; धनगरी गजा, गरबा अन् बाळ्या डान्सने रंगला सोहळा!

October 23, 2026
69
भुदरगड तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?
ताज्या घडामोडी

भुदरगड तालुक्यात विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट; प्रशासनाचे लक्ष कधी जाणार?

October 23, 2026
15
Next Post
नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; सहा जण जखमी

नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; सहा जण जखमी

ताज्या बातम्या

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर थरार; दरीत कोसळलेल्या आई-मुलीची सुखरूप सुटका

लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर थरार; दरीत कोसळलेल्या आई-मुलीची सुखरूप सुटका

October 23, 2026
सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 23, 2026
नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; सहा जण जखमी

नळदुर्ग बायपासवर कंटेनरची भाविकांना धडक; सहा जण जखमी

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In