• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘शिवभक्तांच्या सहकार्याने शिवस्मारकाचा मोठ्या थाटामाटात सोहळा पार पडला’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 23, 2026
in Blog
0
‘शिवभक्तांच्या सहकार्याने शिवस्मारकाचा मोठ्या थाटामाटात सोहळा पार पडला’
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

गेवराई (प्रतिनिधी)

जातेगाव नगरीच्या वैभवात भर घालणारी एक आनंदाची घटना म्हणजे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नवीन शिवस्मारकाचे काम तरुणांच्या अथक परिश्रम व शिवभक्तांच्या सहकार्याने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त स्मारकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.

RelatedPosts

कणकवली शहरात स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

चामोर्शी जि.प.केंद्र शाळेत शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

आजऱ्याच्या निसर्गवेड्यांची दोन वर्षांची तपस्या ‘वणव्यात’ भस्मसात!

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, लहानग्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून काढलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण गाव शिवमय झाले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. विशेष म्हणजे, उत्सवात कुठेही त्रासदायक आवाज होऊ नये म्हणून डीजे बंद ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यामुळे शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वातावरणात हा सोहळा पार पडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

शिवस्मारक समितीच्या नियोजनानुसार मिरवणूक शांततेत व नियोजनबद्ध रितीने पार पडली. ढोल-ताशा पथकांनी वातावरणात उत्साह निर्माण केला, मात्र तरुणाईने संयम व शिस्त राखत महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना आनंदाने सहभागी होण्याची संधी दिली. भगव्या पताका, फुलांची सजावट आणि आकर्षक रोषणाईमुळे गावाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.

या प्रसंगी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षा सौ. शितलताई धोंडरे यांनी भावनिक शब्दांत मनोगत व्यक्त करताना सांगितले, “मी तुमची छोटी-मोठी बहीण म्हणून आणि समितीच्या अध्यक्षा म्हणून सर्व शिवभक्तांचे मनःपूर्वक आभार मानते. तुम्ही दिलेला प्रतिसाद आणि सहकार्य कधीही विसरणार नाही. हाच महाराजांना मानाचा खरा मुजरा आहे. मी आपली कायम ऋणी राहीन.”

शांतता राखणे हे मोठे आव्हान असते; मात्र जातेगावच्या शिवभक्तांनी प्रशासन व समितीला संपूर्ण सहकार्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे’च्या घोषणांनी गावाचा प्रत्येक कोपरा दुमदुमून गेला. हा शिवजन्मोत्सव केवळ जल्लोषाचा नसून शिस्त, सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचा संदेश देणारा ठरला. आसपासच्या परिसरातील तरुण व पालकांनी आदर्श घ्यावा असा हा कार्यक्रम निर्विघ्न व यशस्वीपणे पार पडला.

Tags: Samadhan Samrat
Previous Post

दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना सर्वच क्षेत्रामधील मान्यवरांकडून श्रद्धांजली समर्पित…

Next Post

२२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर!

Related Posts

Blog

कणकवली शहरात स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

March 12, 2026
0
Blog

चामोर्शी जि.प.केंद्र शाळेत शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

March 12, 2026
19
आजऱ्याच्या निसर्गवेड्यांची दोन वर्षांची तपस्या ‘वणव्यात’ भस्मसात!
Blog

आजऱ्याच्या निसर्गवेड्यांची दोन वर्षांची तपस्या ‘वणव्यात’ भस्मसात!

March 12, 2026
133
Blog

Guide From Ra Gamble Publication Away from Ra Free lobstermania slot of charge Or Real money 2026

March 12, 2026
0
Blog

Enjoy Steamtower slot free spins Publication from Ra Position For free otherwise with Real money

March 12, 2026
1
Blog

Guide from Dead Slot Comment 2025 RTP, slot kitty glitter Struck Rate & Extra Features

March 12, 2026
0
Next Post

२२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर!

ताज्या बातम्या

कणकवली शहरात स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

March 12, 2026

चामोर्शी जि.प.केंद्र शाळेत शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी

March 12, 2026
आजऱ्याच्या निसर्गवेड्यांची दोन वर्षांची तपस्या ‘वणव्यात’ भस्मसात!

आजऱ्याच्या निसर्गवेड्यांची दोन वर्षांची तपस्या ‘वणव्यात’ भस्मसात!

March 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In