• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
खेड पिंपरी गावात प्रथमच सर्वधर्मसमभावातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव संपन्न
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

नांदगाव खंडे (जि. अमरावती) प्रतिनिधी:
मौजा खेड पिंपरी येथे यंदा प्रथमच सर्वधर्मसमभावातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यापूर्वी गावात जयंती मर्यादित स्वरूपात साजरी होत असताना, सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांच्या पुढाकारातून यंदा प्रथमच भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमासाठी मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याशी समन्वय साधून आवश्यक परवानगी घेण्यात आली. जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी सुमारे १००० ग्रामस्थांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावात एकोपा वाढविण्याच्या उद्देशाने सर्वधर्मसमभाव रॅली काढण्यात आली, ज्यात सर्व धर्मीय नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

RelatedPosts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे सार्वत्रिक पूजन करण्यात आले. नवउत्सव दुर्गा महिला मंडळाच्या वतीने चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या मिरवणुकीचे आयोजन सर्व धर्मीय नागरिकांच्या वर्गणीतून करण्यात आले होते. विविध धार्मिक गीतांच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देत बाबासाहेबांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

“गावातील जाती-धर्म भेदभाव विसरून सर्वांनी एकत्र येऊन महामानवांच्या जयंती साजऱ्या केल्यास गावाच्या विकासाला चालना मिळते,” असे प्रतिपादन सरपंच मंगेश कांबळे यांनी केले.

कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी मंगरूळ चव्हाळा येथील पोलीस अधिकारी श्रृंगारे यांचे सहकार्य लाभले. तसेच मिरवणुकीसाठी मोफत ट्रॅक्टर उपलब्ध करून देणारे प्रवीण इंगळे, चालक अक्षय जाधव, तसेच चहा-पाणी व्यवस्था करणारे गौरव चौधरी व संतोष चौधरी यांचा सद्धम्म महिला मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या भव्य जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सद्धम्म महिला मंडळ, युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमानंतर गावात एकोप्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी सत्यशील इंगळे, अजय वाघमारे, हंसराज कांबळे, तुळशीदास खांडेकर, रामदास खांडेकर, सुरेश कांबळे, श्रीकृष्ण देशकर, संदीप पाटील, दिलीप किर्दक, शंकर वाघमारे, प्रशांत पाटील, सिद्धार्थ कांबळे, सचिन काकडे, गणेश चहांदे तसेच प्रतिमा वाघमारे, उज्वला किर्दक, कांताबाई इंगळे, मंगला कांबळे, संगीता खांडेकर, सुहाना पाटील, कुसुम खांडेकर, कौशल कांबळे, वर्षा अंबाडारे, प्रतिमा जवंजळ आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Maroti Kalelar
Previous Post

शुभांगी शतपलकरची चंद्रपूर पोलीस दलात निवड; जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी

Next Post

एरंडोलमध्ये भीम जयंतीचा जल्लोष; मोटारसायकल रॅली व भव्य मिरवणुकीने शहर दणाणले

Related Posts

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही
ताज्या घडामोडी

चिंचपूर ढगे तीन दिवसांपासून अंधारात; वालवड सबस्टेशनचे काम पूर्ण होऊनही विजपुरवठा सुरू नाही

June 5, 2026
8
कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका
ताज्या घडामोडी

कळंबोलीत नव्याने बसवलेल्या पेव्हर ब्लॉकची दयनीय अवस्था; नागरिकांचा पैसा पाण्यात जात असल्याची टीका

June 5, 2026
57
पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान
ताज्या घडामोडी

पनवेल महानगरपालिकेचे कार्य अभिमानास्पद; इतर महापालिकांसाठी आदर्श – मुकेश सारवान

June 5, 2026
23
जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार
ताज्या घडामोडी

जप्त केलेल्या हातगाड्या व टपऱ्या दंडाशिवाय परत द्या; विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्या – नगरसेवक निलेश पवार

June 4, 2026
487
महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर
ताज्या घडामोडी

महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन; शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर

June 2, 2026
50
एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ताज्या घडामोडी

एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची लूट थांबवा; अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

June 2, 2026
45
Next Post
एरंडोलमध्ये भीम जयंतीचा जल्लोष; मोटारसायकल रॅली व भव्य मिरवणुकीने शहर दणाणले

एरंडोलमध्ये भीम जयंतीचा जल्लोष; मोटारसायकल रॅली व भव्य मिरवणुकीने शहर दणाणले

ताज्या बातम्या

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

खळी परिसरातील वीज व पाणीपुरवठा समस्येची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली दखल

June 5, 2026
हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

हातिवडेच्या सानिका पाटीलची भारतीय सैन्यात भरारी; वूमन मिलिटरी पोलीस दलात निवड

June 5, 2026
किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

किल्ले पारगडवर भीषण पाणीटंचाई; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तोंडावर शिवप्रेमींमध्ये संताप

June 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In