• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 15, 2026
in ताज्या घडामोडी
0
कोल्हावाडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बालवाचन स्पर्धेचा प्रारंभ
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

मानवत तालुका | प्रतिनिधी

विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मानवत तालुक्यातील कोल्हावाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत “प्रारंभ बालवाचन स्पर्धा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

दिनांक १४ एप्रिल ते १४ जून या कालावधीत ही वाचन स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार असून, यामध्ये विद्यार्थ्यांचा वाचन व लेखन कौशल्य विकास करण्यावर भर देण्यात आला आहे.

कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक बलभीम माथेले व ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून पूजन केले. यावेळी बाबासाहेबांच्या शिक्षण प्रवास, विदेशातील शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी टप्प्याटप्प्याने वाचनाचे नियोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिलपर्यंत सध्याच्या इयत्तेतील पुस्तके वाचून अभिप्राय लिहिणे, १ मे ते १५ मे दरम्यान पुढील इयत्तेतील पुस्तकांचे वाचन, तसेच १५ मे ते १४ जून या कालावधीत संपूर्ण शालेय वाचनालय विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

शाळेत उपलब्ध ३६८ पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचनासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. उत्कृष्ट बालवाचक विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

लोकसहभागातून वाचनालय समृद्ध करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला. पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

गोविंदपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; ४४ वर्षांची परंपरा कायम

Next Post

ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
1
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट

ज्ञानोपासक विद्यालय, रामेटाकळी येथे विद्यार्थिनीचा आदर्श उपक्रम; वाढदिवसानिमित्त संविधानाची प्रत भेट

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In