दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : बोरामणी गावातील भीमनगर येथे Dr. B. R. Ambedkar यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला.
यावेळी बोरामणी गटाचे माजी पंचायत समिती सदस्य धनेश अण्णा अचलारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात भीमनगरातील भीमसैनिकांसह बोरामणी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. उपस्थितांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या आदर्शांना अभिवादन केले.
या जयंती कार्यक्रमामुळे भीमनगर परिसरात सामाजिक एकात्मता आणि प्रेरणेचा संदेश देणारे वातावरण निर्माण झाले.










