• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१७ (प्रतिनिधी)
येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शहादा आगारात सन २०२६ चा शिव, शाहू, फुले, आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आणि भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य चंदन पानपाटील, युवा व्याख्याते सचिन पानपाटील, प्रमुख मार्गदर्शक दादाभाई पिंपळे, रघुनाथ बळसाने, अपंग महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर, भडगावचे पोलीस पाटील धनराज पानपाटील आणि ब्ल्यू टायगर ग्रुपचे अध्यक्ष संजू दादा पानपाटील उपस्थित होते. आगार व्यवस्थापक हरीश भोई व स्थानक प्रमुख पी. जी. पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर मोलाचे सहकार्य केले.केवळ उत्सव साजरा न करता समाजासाठी काहीतरी देणं लागतं, या भावनेतून आयोजित रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

तसेच, महापुरुषांचे विचार घरोघरी पोहोचावेत या उद्देशाने उपस्थित नागरिकांना व कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शकांनी महापुरुषांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाश टाकला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वाखाली तात्याभाऊ निकम, संतोष आगळे, हर्षल निकुंभ, देवेंद्र पानपाटील, संदीप पाटील, रतीलाल पानपाटील, नंदशेखर बाविस्कर, कैलास पाटील, नितीन कोळी, मकसूद खान, हरिश्चंद्र सोनवणे, मयूर शिवदे, बापू कोळी, किशोर कोळी, रवींद्र डोडीस, प्रकाश धनगर, प्रवीण भामरे आणि प्रणिल ठाकरे यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमात महिला प्रतिनिधी आरती जोशी, सुनिताताई कुवर, रंजना कोळी, कविता सुरळकर आणि सुवर्णा पाटील यांचाही सक्रिय सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम महिंद्रे यांनी केले. या संयुक्त जयंती महोत्सवामुळे परिसरात एकतेचे आणि वैचारिक प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं. १ चे ‘दुहेरी’ यश

Next Post

शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.

शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In