• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; माजी उपनगराध्यक्षांनी अडवलेला ६ मीटरचा रस्ता झाला मोकळा.
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

शहादा,दि.१६ (प्रतिनिधी)
शहरातील जुन्या खेतिया रस्त्यालगत असलेल्या मेमन जिन कंपाऊंड परिसरातील बागवान जमातखाण्याजवळील रस्त्यावरील अतिक्रमण अखेर पालिकेने भुईसपाट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या कारवाईमुळे ६ मीटर रुंदीच्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून पालिकेच्या या धडक कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,मेमन जिन कंपाऊंड परिसरात माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मुशीर व त्यांच्या शेजारील प्लॉट धारकाने ६ मीटरच्या सार्वजनिक रस्त्यावर भिंत बांधून व लोखंडी गेट बसवून अतिक्रमण केले होते. रस्ता अडवला गेल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत होती. या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात पालिकेचे माजी नगरसेवक व गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांनी मुख्याधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.पालिका प्रशासनाकडून कारवाईला विलंब होत असल्याने प्रा. मकरंद पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याची दखल घेत पालिका प्रशासनाने संबंधित अतिक्रमणधारकांना दि.१६ एप्रिल रोजी कारवाई करण्याची नोटीस बजावली होती. कारवाईच्या भीतीने संबंधित घरमालकाने काल दि. १५ रोजी स्वतःहून लोखंडी गेट काढले होते,

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

मात्र पालिका प्रशासनाने केवळ गेट नाही तर पूर्ण बांधकाम हटवण्याची भूमिका घेतली.मुख्याधिकारी साजिद पिंजारी व इंजिनिअर संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने थेट अतिक्रमित बांधकामावर हातोडा चालवून पूर्ण रस्ता मोकळा केला.सार्वजनिक रस्ते हे नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत. त्यावर झालेले कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

*आता शहरवासीयांचे लक्ष ‘या’ अतिक्रमणांकडे–
बागवान जमातखाण्याजवळील कारवाईनंतर आता शहरातील इतर भागांतील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषत: यशोधन कॉलनी परिसरात रस्त्यावरील चॅनल गेटचे अतिक्रमण,शहादा पीपल्स बँक मुख्य इमारत, स्टेट बँक चौक.बस स्थानक परिसर, नगरपालिका परिसर, पंचायत समिती आणि प्रेस मारुती परिसर,जुना मोहिदा रोड, गरीब नवाज कॉलनी आणि पाडळदा रोड चौफुली या भागातील कच्ची आणि पक्की अतिक्रमणे पालिका प्रशासन आता कधी काढणार याकडे संपूर्ण शहादा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा आगारात संयुक्त जयंती महोत्सवात रक्तदान शिबिर आणि संविधान वाटपाने महापुरुषांना अभिवादन.

Next Post

शहाद्यात मोफत बाल हृदय तपासणी शिबिर संपन्न; २२ बालकांना जीवदान मिळणार.

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
शहाद्यात मोफत बाल हृदय तपासणी शिबिर संपन्न; २२ बालकांना जीवदान मिळणार.

शहाद्यात मोफत बाल हृदय तपासणी शिबिर संपन्न; २२ बालकांना जीवदान मिळणार.

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In