• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोलीत नवीन सुसज्ज रुग्णालयाला पनवेल महापालिकेची मंजुरी; उपमहापौर सौ. प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
कळंबोलीत नवीन सुसज्ज रुग्णालयाला पनवेल महापालिकेची मंजुरी; उपमहापौर सौ. प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…
0
SHARES
135
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल/कळंबोली(ता. प्रतिनिधी):-
कळंबोली परिसरातील वाढती लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेता सेक्टर ५ई, प्लॉट क्र. ९ येथे आधुनिक व सुसज्ज रुग्णालय उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव पुढे आला आहे. उपमहापौर प्रमिला रविनाथ पाटील यांनी याबाबत पनवेल महानगरपालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य विभागाने या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

कळंबोली परिसर न झपाट्याने विकसित होत असून येथे न लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र अद्ययावत आणि सर्व सुविधा असलेले रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना उपचारासाठी दूर जावे लागते. यामुळे वेळ व आर्थिक खर्च वाढत असल्याची बाब न अधोरेखित करण्यात आली आहे.

RelatedPosts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

प्रस्तावित रुग्णालयात आपत्कालीन सेवा, आयसीयू व एनआयसीयू सुविधा, प्रसूती व स्त्रीरोग विभाग, बालरोग विभाग, जनरल व स्पेशालिटी ओपीडी तसेच
आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना जलद, दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा मिळणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल.

दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या पत्रानुसार यापूर्वी कोविड काळात कळंबोली येथील डीसीएच रुग्णालय बंद केल्यानंतर त्या इमारतीचा वापर संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या अंतर्गत ऑक्सिजन बेड्स व आयसीयू बेड्ससह ‘इन्फेक्शस डिसीज हॉस्पिटल’ उभारण्याची योजना आहे. या रुग्णालयात स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यू, कोविड-१९, मिजल्स, हिपॅटायटिस बी, टायफॉईड, चिकनपॉक्स, निमोनिया आदी आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी प्रसूती सेवेसाठी स्वतंत्र मातृत्व व बाल रुग्णालय उभारण्याचाही प्रस्ताव आहे. या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग, महिला वॉर्ड, नवजात अतिदक्षता कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, रक्तपेढी आदी सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

या सर्व प्रस्तावांमुळे कळंबोली व पनवेल परिसरातील आरोग्य व्यवस्थेत मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना स्थानिक पातळीवरच अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होईल, असे उपमहापौर प्रमिला पाटील यांनी म्हटले आहे.

Ad 1
Previous Post

पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

Next Post

सुरेगाव रस्ता येथे प्रदोष निमित्त किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

Related Posts

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ
ताज्या घडामोडी

मदनापूरजवळ रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृत्यू; किनवट परिसरात खळबळ

October 18, 2026
22
माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव
ताज्या घडामोडी

माढेळीच्या आदर्श दुर्गा उत्सव मंडळाचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात; २२ ऑक्टोबरला दिंडी स्पर्धा व गरबा महोत्सव

October 18, 2026
8
अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ताज्या घडामोडी

अमली पदार्थविरोधी कारवाईबद्दल छत्रपती संभाजीनगर टास्क फोर्सच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

October 18, 2026
3
ताज्या घडामोडी

साताऱ्यात गोडोली नाक्यावरील वाहतुकीत मोठे बदल; २२ ऑक्टोबरपासून पर्यायी मार्गांचा वापर करा

October 18, 2026
0
ताज्या घडामोडी

माहूर नगरपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेला मिळणार का?

October 18, 2026
15
सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?
ताज्या घडामोडी

सातारा एसटी आगारात अस्वच्छतेचा विळखा; प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष?

October 18, 2026
7
Next Post
सुरेगाव रस्ता येथे प्रदोष निमित्त किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

सुरेगाव रस्ता येथे प्रदोष निमित्त किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In