• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 17, 2026
in Blog
0
पनवेलमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ समर्थनार्थ भाजप च्या वतीने भव्य पदयात्रेचे आयोजन
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल:प्रतिनिधी-
भारतीय लोकशाहीतील ऐतिहासिक आणि परिवर्तनकारी टप्पा मानल्या जाणाऱ्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी व जनसमर्थन मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुरुवारी पनवेल शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.या पदयात्रेत पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील,भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर,उपमहापौर प्रमिला पाटील,स्थायी समिती सभापती बबन मुकादम,महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील,माजी महापौर कविता चौतमोल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,भाजपच्या जिल्हा सरचिटणीस रविनाथ पाटील, चारुशीला घरत, रमेश मुंढे, प्रल्हाद केणी, जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

पदयात्रेची सुरुवात पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून करण्यात आली. त्यानंतर बाजारपेठ मार्गे जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून पुढे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही पदयात्रा पुढे सरकत ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. संपूर्ण पदयात्रेदरम्यान घोषणाबाजी, फलक आणि बॅनरच्या माध्यमातून ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’चे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.यावेळी या कायद्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून या अधिनियमाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा हा कायदा महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.या निर्णयामुळे धोरणनिर्मितीत महिलांचा सहभाग वाढून देशाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ हा केवळ आरक्षणाचा कायदा नसून महिलांच्या सन्मानाचे आणि समान हक्कांचे प्रतीक आहे. या माध्यमातून सामान्य कुटुंबातील कर्तृत्ववान महिलांना राजकारणात येण्याची संधी उपलब्ध होणार असून,देशाच्या प्रगतीत महिलांचा सहभाग अधिक बळकट होणार आहे. पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांचे व नागरिकांचे त्यांनी आभारही मानले तसेच हे विधेयक मान्य होईपर्यत आणि त्यानंतरही पाठिंबा कायम रहावा, तसेच नारी शक्ती वंदन अधिनियमला पाठींबा देण्यासाठी ९६६७१७३३३३ या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

भविष्यातही महिलांच्या हक्कांसाठी व सक्षमीकरणासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा निर्धार जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी यावेळी व्यक्त केला. विकसित भारताच्या निर्मितीसाठी महिलांच्या शक्तीचा प्रभावीपणे उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगून हा कायदा भारताच्या लोकशाही व्यवस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या पदयात्रेदरम्यान ‘भारत माता की जय’, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, राष्ट्रमाता सावित्रीबाई गूळ यांचा विजय असो, ‘राजमाता जिजाऊ यांचा विजय असो’, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा विजय असो,नारी शक्ती देशाची प्रगती, स्त्री सन्मान देशाचा अभिमान, ‘नारी शिकवा नारी वाचवा’, सशक्त नारी सशक्त भारत’, ‘सशक्त नारी समर्थ राष्ट्र’, ‘तिच्या कष्टाने उभा राहतो संसार नारीशक्तीमुळेच उजळतो प्रत्येक परिवार’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Ad 1
Previous Post

रोजगार हमी योजनेची कामे खोळंबली, शेतकरी त्रस्त!;वंचितच्या उपसभापतीचीं सीईओ कडे तक्रार..

Next Post

कळंबोलीत नवीन सुसज्ज रुग्णालयाला पनवेल महापालिकेची मंजुरी; उपमहापौर सौ. प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
6
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
12
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
26
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
2
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post
कळंबोलीत नवीन सुसज्ज रुग्णालयाला पनवेल महापालिकेची मंजुरी; उपमहापौर सौ. प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

कळंबोलीत नवीन सुसज्ज रुग्णालयाला पनवेल महापालिकेची मंजुरी; उपमहापौर सौ. प्रमिला पाटील यांच्या पाठपुराव्याला यश…

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In