• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६४ पैकी १० विषय नामंजूर; बांधकाम सभापतींचा आक्रमक पवित्रा.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ६४ पैकी १० विषय नामंजूर; बांधकाम सभापतींचा आक्रमक पवित्रा.
0
SHARES
40
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१७(प्रतिनिधी)
शहादा नगर परिषदेची तिसरी सर्वसाधारण सभा दि.१७ एप्रिल रोजी दुपारी पालिकेच्या सभागृहात संपन्न झाली. दुपारी साडेतीन वाजता सुरू झालेली ही सभा तीन तासापावेतो कधी तणावपूर्ण तर कधी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत विषय पत्रिकेवरील एकूण ६४ विषयांपैकी १० विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले तर उर्वरित विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली.
पालिकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील होते. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील व मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला विविध विषय समित्यांचे सभापती, प्रतोद, सर्व नगरसेवक आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

सभेच्या सुरुवातीपासूनच अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. विशेषतः बांधकाम सभापती संतोष वाल्हे हे अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसून आले. त्यांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी नगराध्यक्षांच्या दिशेने काळीपट्टी भिरकावली. मात्र, नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी अत्यंत शांत आणि संयमी भूमिका घेत सभेचे कामकाज पुढे चालू ठेवले.सभेत झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष सौ. माधवी पाटील, भाजपा प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी, संतोष वाल्हे, ललित छाजेड, सागर मराठे, प्रदीप ठाकरे, मुनेशचंद्र जगदेव, दीपक कोळी, वसीम तेली, एडवोकेट दानिश पठाण आदींनी सहभाग नोंदवून आपली मते मांडली.या सभेत जे विषय नामंजूर किंवा स्थगित करण्यात आले त्यात प्रामुख्याने खासदार गोवाल पाडवी यांनी सुचविलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथील भौतिक सुविधा पुरविणे, पालिकेच्या अभिलेख विभागातील दप्तर अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन बायोमायनिंग करणे, जुने मंगळ बाजार येथील अहुजा मेडिकल व नहाटा स्टोर्स या जागेत बांधकाम करणे, आरक्षण क्रमांक २१ वरील गाळेधारकांना मुदतवाढ देणे, त्याच आरक्षण जागेवर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी जिना तयार करणे, स्वच्छता विभागासाठी खुर्च्या खरेदी करणे, जुन्या भाजी मार्केटच्या जागेवर सुसज्ज संकुल बांधणे, विविध साहित्य खरेदीसाठी ठेकेदारास मुदतवाढ देणे आणि कुकडेल शिवार सर्वे नंबर २४६ या जागेवर कंपाऊंड करणे या विषयांचा समावेश आहे.

हे विषय पुढील बैठकीत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.आरोग्य व स्वच्छता विभागाच्या विषयावर बोलतांना आरोग्य सभापती सुनील पाटील यांनी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी योग्य माहिती देत नसल्याची तक्रार करत यावर सखोल चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच वाचनालयातील ८० खुर्च्यांपैकी ६० खुर्च्या कुठे गेल्या, यावरूनही सभागृहात बरीच चर्चा झडली. पालिकेचे काही कर्मचारी स्वतःच वेगवेगळ्या विभागातील कामे घेत असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली.
आयत्या वेळच्या विषयांमध्ये मुनेशचंद्र जगदेव यांनी पालिकेस शहादा-कुकडेल असे नाव देण्याची मागणी केली, तर स्वीकृत नगरसेवक कल्पेश पटेल यांनी डोंगरगाव रस्त्यास स्वामीनारायण मार्ग असे नामकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला.नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी शेवटी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, त्यांनी सभागृहात आणि नगरसेवकांना परिपूर्ण माहिती उपलब्ध करून द्यावी. तसेच कर्मचाऱ्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदी तपासून योग्य तो निर्णय घ्यावा असे सुचविले. उपनगराध्यक्ष सौ. माधवी पाटील यांनीही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्ययावत माहिती ठेवावी आणि नगरसेवकांच्या प्रश्नांना कायदेशीर व व्यवस्थित उत्तरे द्यावीत, अशी सूचना केली.सभेचे सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक दिलीप वसावे यांनी केले, तर आभार मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी मानले.

Ad 1
Previous Post

भूमाफिया आमदार चंद्रकांत रघुवंशीवर श्रीमती मित्ताली सेठी कारवाई करतील का? जिल्हाधिकारी यांना बिरसा फायटर्सचा सवाल!

Next Post

🌧️ मुंगशी परिसरात अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
🌧️ मुंगशी परिसरात अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

🌧️ मुंगशी परिसरात अवकाळी पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In