• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत
खारपाडा पेण

“आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!”
छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा स्वातंत्र्याची, राजधानीसाठी निवड केली रायगडाची! सिमादेवी पालखी सोहळ्याने, शोभा वाढवली खारपाडा गावाची!!

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

हाय खारपाड्याची शान, आई सिमादेवी..!
जय जय जयकार.. सिमादेवीचा बोला..!!
सालाबादप्रमाणे यावर्षीही पेण तालुक्यातील खारपाडा गावात आई सिमादेवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. आई सिमादेवी मातेचे मंदिर पाताळगंगा नदी तीरावर खारपाडा गावाच्या पश्चिम दिशेस वसलेले आहे. पूर्वी येथे २०० ते ३०० वर्षापूर्वीचे जुने मोठे पाल्याचे झाड होते. अशी आख्यायिका सांगितली जाते की रावे गावची ‘रायबा देवी’ आणि साई गावची ‘भवानी माता’ ह्या सिमादेवी मातेच्या बहिणी आहेत आणि ‘बहिरी देव’ आईचा भाऊ. दरवर्षी चैत्र अमावास्येच्या आदल्या दिवशी हा पालखी सोहळा आयोजित केला जातो. प्रत्येक जण अंगणात रांगोळी काढतात. सर्व खारपाडा गाव स्वच्छ आणि सुशोभित होते. पाताळगंगा
नदी तिरावरील मंदिरात विधिवत पूजा होते. तदनंतर श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.

आई सिमादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. येणारे भाविक तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेत होते. पालखीवाले संजय नारायण घरत, नितीन नारायण घरत यांच्या घरी परंपरागत पद्धतीने मठात देवीचा मुकुट असतो. त्याची नित्यनेमाने पूजा वर्षभर करतात. पालखी सोहळाच्या दिवशी आई सिमादेवीचा मुकुट पालखीत बसवून पाताळगंगा नदी काठावर वसलेल्या आई सिमादेवी मंदिरात नेऊन विधिवत पूजन करून आरती घेवून नंतर पूर्ण गावात चेरोबा मंदिर, होळीचा होम, ग्रामपंचायत कार्यालय ते गावदेवी मंदिर(चव्हाटा) ते रस्त्यावरील हनुमान मंदिर, वरची पाटील आळी ते आंदेश्वर आळी ते चार बंगला ते पालखीवाले यांच्या निवासस्थानी मठात मुकुट विराजमान करतात. संपूर्ण गावात डिजे आणि बँडवर वाजत गाजत नाचत सीमादेवी माते की जय! आई माऊलीचा उदो उदो!! या घोषणांनी आसमंत दुमदुमून जातो. आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पारंपरिक आगरी कोळी टोपी, लंगोट आगरीकोळी पारंपारिक वेशभूषा परिधान करून सर्वजण नाच गाण्यात दंग होते. सीमादेवीची पालखी श्री.संजय नारायण घरत पालखीवाले यांच्या घरातून संध्याकाळी ७ वाजता निघते तेथून ती नदीवरील आई सिमादेवीचे मंदिर ते संपूर्ण खारपाडा गावात फिरवून सकाळी ११ वाजेपर्यंत गावात पालखीवाले यांच्या घरी माघारी आणतात.

नंतर आरती घेऊन या पालखी सोहळ्याची सांगता झाली. आई सिमादेवी पालखी सोहळ्यामध्ये लहान, थोर, महिला, पुरुष, तरुण वर्ग सर्वजण देहभान विसरून भक्तीत रममाण होऊन गेले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार श्री.कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपल्या कुटुंबियांसोबत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. कु.ओवी कैलास घरत आईसाहेब सौ.निर्मला कमलाकर घरत, अण्णासाहेब श्री कमलाकर बाबू घरत, बहीण सौ.कविता सचिन गावंड दर्शनासाठी उपस्थित होते. मुंबई, ठाणे, पुणे ,खोपोली, कल्याण, रत्नागिरी, नवी मुंबई कामानिमित्त बाहेरगावी असलेले सर्व गावकरी वर्षातून एकदा साजऱ्या होणाऱ्या या पालखी उत्सव सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहून आई सिमादेवी माऊलीचे मनोभावे दर्शन घेतात. ‘भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी’..अशी आई सिमादेवीची ख्याती प्रख्यात असून खारपाडा पंचक्रोशी तसेच पेण पनवेल तालुक्यातील भक्त मंडळी नवस फेडायला आईच्या चरणी येत असतात. अतिशय हर्ष उल्हासात तरुण वर्ग, बच्चे कंपनी, महिला वर्ग, ज्येष्ठ मंडळी सर्वजण देहभान विसरून बँड आणि डीजे गाण्यावर पालखी सोहळ्यात मंत्र मुग्ध होऊन नाचत होते अतिशय हर्ष उल्हासात हा पालखी सोहळा पार पाडला. आई सिमादेवी पालखी सोहळा यशस्वी रीतीने पार पडण्यासाठी ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा ग्रामस्थ, युवा वर्ग, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, सदस्य, आई सिमादेवी पालखी सोहळा कमिटी सदस्य व पोलिस प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Ad 1
Tags: Kailas Gharat
Previous Post

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम;रायगड पोलीस दलास ६१५ बॅरिकेड्स व १६ ब्रेथ ॲनालायझर सुपूर्द

Next Post

दारूम स्वामी समर्थ मठात भक्तीचा उत्साह ओसंडला

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
दारूम स्वामी समर्थ मठात भक्तीचा उत्साह ओसंडला

दारूम स्वामी समर्थ मठात भक्तीचा उत्साह ओसंडला

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In