• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम;रायगड पोलीस दलास ६१५ बॅरिकेड्स व १६ ब्रेथ ॲनालायझर सुपूर्द

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम;रायगड पोलीस दलास ६१५ बॅरिकेड्स व १६ ब्रेथ ॲनालायझर सुपूर्द
0
SHARES
125
VIEWS
Ad 1
Ad 1

अलिबाग/पनवेल: (पनवेल प्रतिनिधी): समाजातील विविध स्तरावर आपल्या सामाजिक आणि जनहितार्थ कार्याचा ठसा उमटवणाऱ्या रेवदंडा येथील ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’च्या वतीने रायगड पोलीस दलाला ६१५ बॅरिकेड्स आणि १६ ब्रेथ ॲनालायझर मशीनचे नुकतेच वाटप करण्यात आले.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रस्ते सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे डॉ. सचिन दादा धर्माधिकारी, श्री. उमेश दादा धर्माधिकारी आणि श्री. राहुल दादा धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते रायगडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांच्याकडे हे साहित्य सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले.

रायगड जिल्ह्यात सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या, सण-उत्सव आणि पर्यटनाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिसांकडे बॅरिकेड्सची मोठी गरज असते. प्रतिष्ठानने दिलेल्या ६१५ बॅरिकेड्समुळे गर्दीचे नियोजन आणि बंदोबस्तासाठी पोलीस दलाला मोठी मदत होणार आहे. तसेच, मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी १६ अत्याधुनिक ‘ब्रेथ ॲनालायझर’ मशीन्स उपयुक्त ठरणार आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पोलीस दल अहोरात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करत असते. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दिलेले हे साहित्य पोलिसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मोलाचे ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने आजवर स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे आणि शैक्षणिक मदतीसोबतच प्रशासनाला वेळोवेळी असे सहकार्य करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Ganesh Ladh
Previous Post

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

Next Post

आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

आई सिमादेवी पालखी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..!

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In