• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीगोंद्यात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ चा भव्य जागर; दिग्गज वक्त्यांच्या व्याख्यानमालेचे आयोजन..
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा:प्रतिनिधी

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून श्रीगोंदा शहरात ‘महामानव विचार प्रबोधन यात्रा २०२६’ अंतर्गत भव्य जाहीर व्याख्यान सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज पत्रकार परिषदेत संयोजकांनी माहिती दिली.

बुधवार, १५ एप्रिलपासून या वैचारिक उत्सवाला सुरुवात झाली असून, २३ एप्रिलपर्यंत ही प्रबोधन यात्रा शहरात विचारांची पेरणी करणार आहे. संत शेख महंमद महाराज पटांगण येथे दररोज सायंकाळी ७:०० वाजता ही व्याख्यानमाला संपन्न होत आहे.

सावित्री-फातिमा सद्भावना विचारमंच, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच, महात्मा फुले समता परिषद आणि सत्यशोधक समाज पक्ष, बहुजन समाज पक्ष, बहुजन समता पक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना, यांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

या प्रबोधन यात्रेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत.

बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी व्याख्यानमालेचा प्रारंभ मा. दिपकभाई केदार (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना) यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला आहे.

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ रोजी कार्यक्रमाचे व्याख्याते: मा. अजिंक्य चांदणे (प्रदेशाध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया).. अध्यक्ष: श्री. विठ्ठलराव वाडगे (संस्थापक-अध्यक्ष, वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्था).. प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते (अध्यक्षा, परिक्रमा शैक्षणिक संकुल), सौ. अनुराधा ठवाळ (माजी पं. स. सदस्या) हे असणार आहेत.

गुरुवार, २३ एप्रिल २०२६ (सांगता समारंभ) साठी व्याख्याते: मा. प्रा. सुकुमार कांबळे (संस्थापक अध्यक्ष, डेमॉक्रॉटीक पार्टी ऑफ इंडिया)
अध्यक्ष: डॉ. रफिक सय्यद (प्रबोधनकार, पारनेर),प्रमुख पाहुणे: डॉ. सौ. प्रणोती जगताप, सौ. शुभांगी पोटे (माजी नगराध्यक्षा, श्रीगोंदा) हे आहेत.

या प्रबोधन यात्रेच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, प्रेरणा सेवा संघटना, ऑल इंडिया पॅंथर सेना, बहुजन समता पार्टी आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना यांसह अनेक संघटनांनी कंबर कसली आहे.

आज दिनांक १६ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. संभाजी आप्पा बोरुडे, सुनिल ओहोळ, नंदूभाऊ ससाने, दीपकशेठ घोडके, वसंतराव सकट व संजय रणसिंग यांनी तालुक्यातील नागरिकांना या वैचारिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

महापुरुषांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात सलोखा निर्माण करणे हाच या प्रबोधन यात्रेचा मुख्य उद्देश आहे,” असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

*राहुल वस्तीगृहात आंबेडकर जयंती साजरी.

Next Post

एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
20
Next Post
एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…

एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…

ताज्या बातम्या

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

पावसाने दडी मारल्याने येरमाळा परिसरातील सोयाबीन पीक करपले; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

September 2, 2026

पारगाव प्रभाग समिती बैठकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

September 2, 2026
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

September 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In