• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी झटणारे एस.टी.चे चालक-वाहक ‘देवदूत’; किनवट संशोधन केंद्रातर्फे विशेष गौरव.
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

किनवट: आजच्या धावपळीच्या आणि मेट्रो शहरांतील असुरक्षिततेच्या बातम्यांच्या काळात, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एस.टी. महामंडळाची बस आजही कशी सुरक्षित आणि ‘संजीवनी’ ठरते, याचे आदर्श उदाहरण किनवट येथे पाहायला मिळाले. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन विद्यार्थिनींची बालकाप्रमाणे काळजी घेणारे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चालक गुरुसिंग ठाकूर आणि वाहक वैशाली किनागे यांचा आज ‘कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र’ (स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, किनवट) येथे भव्य सत्कार करण्यात आला.

बी.एस.डब्ल्यू. (BSW) प्रथम वर्षात शिकणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना दररोज सकाळी न चुकता त्यांच्या गावापासून केंद्राच्या गेटपर्यंत सुरक्षित पोहोचवणे आणि सायंकाळी वर्ग संपल्यानंतर स्वतः फोन करून किंवा वर्गापर्यंत येऊन विद्यार्थिनींना बसमध्ये बसवून घरी पोहोचवण्याचे काम हे दोघेही वर्षभरापासून अविरतपणे करत आहेत. विशेष म्हणजे, ज्या विद्यार्थिनींचे बस पास संपले असतील, त्यांचे नाव नोंदवून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून त्यांना पास काढून देण्यापर्यंतची संवेदनशीलता या चालक-वाहकांनी दाखवली आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

विद्यार्थिनींच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. वर्षभर मिळालेल्या या सुरक्षित सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्राच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांच्या हस्ते चालक गुरुसिंग ठाकूर व वाहक वैशाली किनागे यांना पुष्पहार आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या गौरव सोहळ्याला अभिजीत इंडस्ट्रीचे मालक यशवंत जाधव साहेब व सामाजिक कार्यकर्ते विनायक गव्हाणे आणि केंद्राच्या प्राध्यापिका प्रीती देवस्थळे, डॉ. प्रमोद राठोड, डॉ. प्रवीण खंडागळे, प्रा. चेतन जाधव, प्रा. श्रीकांत दुधारे, प्रा. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रातील कर्मचारी विठ्ठल हंबर्डे, रमेश जकुलवार, वर्षाताई, रामभाऊ आणि दररोज प्रवास करणाऱ्या सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

“ग्रामीण भागातील मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी पालकांचा एस.टी.वर मोठा विश्वास असतो. ठाकूर आणि किनागे यांनी हा विश्वास सार्थ ठरवला आहे. अशा प्रामाणिक कर्मचाऱ्यांमुळेच महामंडळाची प्रतिमा उंचावत आहे,” असे गौरवद्गार केंद्राचे समन्वयक डॉ. नितीन गायकवाड यांनी यावेळी काढले.

या आगळ्यावेगळ्या सत्काराची चर्चा संपूर्ण परिसरात होत असून, महामंडळाच्या या ‘कर्तव्यदक्ष’ कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: Shaikh moien
Previous Post

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबिर’ पाचोरा तालुक्यात यशस्वी

Next Post

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

पुलाच्या खड्ड्यात बैलगाडी कोसळली; बैलाचा मृत्यू, शेतकरी जखमी

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In