• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोर व्याघ्र प्रकल्पात ‘निसर्गानुभव’ घेण्याची संधी; ४४ मचाणांवरून होणार वन्यप्राणी गणना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
27
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी –

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात दरवर्षीप्रमाणे यंदाही बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ‘पाणस्थळावरील निसर्गानुभव कार्यक्रम–२०२६’ आयोजित करण्यात आला आहे. दि. १ मे २०२६ रोजी होणाऱ्या या उपक्रमातून वन्यजीव प्रेमींना मचाणावरून वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या वर्षी बफर आणि कोअर अशा दोन्ही क्षेत्रांतील एकूण पाच वनपरिक्षेत्रांमध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये हिंगणी बफर, बांगडापूर बफर, न्यू बोर अभयारण्य (हिंगणी कोअर), बोरधरण कोअर आणि कवडस कोअर या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व भागांतील एकूण ४४ मचाणांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या सहभागी निसर्गप्रेमींना दि. १ मे रोजी दुपारी ३ वाजेपासून ते दि. २ मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मचाणावर बसून वन्यजीवांचे निरीक्षण आणि नोंदी करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमासाठी अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, www.penchtigerreserve.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील Google Form द्वारे नोंदणी करता येईल. अर्ज करण्याची मुदत दि. २० एप्रिल २०२६ दुपारी १२ वाजेपासून ते दि. २२ एप्रिल २०२६ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

निवड प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर होणार असून, मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मागील वर्षी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे इच्छुकांनी वेळेत नोंदणी करण्याचे आवाहन बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश जी. ठेंगडी यांनी केले आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

रेल्वेसमोर उडी घेऊन तरुणाचा मृत्यू; वाहितपूर शिवारात दुर्दैवी घटना

Next Post

अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
Next Post
अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

अंबाजोगाई माहेश्वरी तालुका कार्यकारिणी २०२६–२०२९ जाहीर; पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In