• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध; शहाद्यात शिवसेना महिला आघाडीचे तीव्र आंदोलन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २० (का.प्र.)

संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाला विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर शहादा तालुक्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कन्साई येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विशेषतः आदिवासी समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत काँग्रेस व इंडी आघाडीच्या भूमिकेचा निषेध केला.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

कन्साई (ता. शहादा) येथे झालेल्या या आंदोलनात महिलांनी आरोप केला की, महिलांना संसद व विधानसभेत हक्काचे प्रतिनिधित्व मिळवून देणाऱ्या या महत्त्वाच्या विधेयकाला विरोध करून काँग्रेस आघाडीने महिलांच्या प्रगतीला अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे महिलांना पुन्हा एकदा राजकीय हक्कांपासून वंचित राहावे लागेल, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्या कु. प्रियांका ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “या विधेयकामुळे महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढले असते. मात्र, काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या भूमिकेमुळे गरीब, आदिवासी, दलित व मागासवर्गीय महिलांना सत्तेच्या सर्वोच्च पातळीवर जाण्यापासून रोखले गेले आहे.”

आंदोलनादरम्यान “महिलांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे”, “विधेयकाला विरोध करणाऱ्यांचा धिक्कार असो”, “नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

या आंदोलनात कु. प्रियांका ठाकरे, रिनाबाई ठाकरे, सुशीलाबाई पवार, कोमलाबाई पाडवी, रेखाबाई ठाकरे, गणाबाई सोनवणे, हिराबाई ठाकरे, उखडीबाई ठाकरे, आहलीबाई वळवी, तुशाबाई वळवी, सुमन रहासे, नियावंती मोरे, ओबिता ठाकरे, रीता ठाकरे यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसेना शहादा तालुका प्रमुख मनलेश जायसवाल, ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पेंढारकर, लक्ष्मण पवार, गिना ठाकरे, गुलाब वळवी, रोहिदास वळवी, आत्माराम बर्डे, धनराज जायसवाल, जगदीश ठाकरे, संतोष पवार, जुमा पटले, सुदाम ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.

या आंदोलनातून महिलांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट असल्याचा ठाम संदेश दिला.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहादा शहरात ऐतिहासिक निर्णय; पाण्याच्या टाकीजवळील चौकाला ‘संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज चौक’ नाव

Next Post

भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
137
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
99
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन

भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In