• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा: ‘चावरा इंग्लिश स्कूल’ प्रकरणी चौकशीचे आदेश; पालकांमध्ये उत्सुकता
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 20 (प्रतिनिधी)
शहरातील नामांकित ‘चावरा इंग्लिश स्कूल’विरोधात करण्यात आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’कडून करण्यात आलेल्या तक्रारींमध्ये विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, नियमबाह्य फी आकारणी तसेच आर्थिक गैरप्रकारांचे आरोप करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. तसेच व्यवहार रोखीने करून पावती न देण्याचा आरोपही करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली सक्तीने वसुली केली जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. पैसे न भरल्यास विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण कमी करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत आहे.

RelatedPosts

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

या संदर्भात शहादा तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटशिक्षण अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश देत २१ एप्रिल २०२६ पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, यानंतर कोणतेही स्मरणपत्र दिले जाणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी दिला आहे.

या चौकशी अहवालाकडे आता पालक, विद्यार्थी आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, सत्य काय समोर येते याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

भोई समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रकाशन

Next Post

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

Related Posts

ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
3
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
137
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
99
ताज्या घडामोडी

गुप्तेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन

July 19, 2026
23
येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

July 18, 2026
67
Next Post
रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

रयत प्रज्ञाशोध परीक्षेत राजमाता विजयराजे शिंदे कन्या विद्यालयाचे उल्लेखनीय यश

ताज्या बातम्या

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

कणकवली इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

July 21, 2026
मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत; वैभव नाईक यांचे आवाहन

July 21, 2026

वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकाच चालवणार; महासभेत निर्णय, १०८ पदभरतीसाठी आमदारांना महापौरांचे आवाहन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In