• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात शहाद्यात एल्गार; ‘आरक्षण संपविण्याचे षडयंत्र’ असा आरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २१ (प्रतिनिधी) – अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या हालचालींविरोधात शहादा येथे आंबेडकरी अनुयायांनी तीव्र भूमिका घेत एल्गार पुकारला. केंद्र व राज्य सरकार घटनादत्त आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले स्मारक येथे विविध पक्ष, सामाजिक संस्था आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. तसेच ‘आरक्षण जनजागृती समिती’च्या माध्यमातून शासनाला लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

बैठकीत वक्त्यांनी आरक्षणाच्या ऐतिहासिक व घटनात्मक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकताना महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांनी आरक्षणाची पायाभरणी केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला संविधानिक दर्जा दिला, असे नमूद केले. आरक्षण हे केवळ गरिबी निर्मूलनासाठी नसून प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याचे प्रभावी साधन असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

भारतीय संविधानातील कलम ३३०, ३३२, १६(४) आणि ३३५ अंतर्गत अनुसूचित जातींना एकत्रित आरक्षणाची तरतूद आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालय यांच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निकालानंतर राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार मिळाल्याने या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. हे उपवर्गीकरण संविधानिक नसून केवळ वैधानिक स्वरूपाचे असून भविष्यात आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच धक्का बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

२०११ च्या जनगणनेचा दाखला देत उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींच्या १३ टक्के आरक्षणावर परिणाम होऊन विविध उपजातींमध्ये स्पर्धा वाढेल, तसेच संधींचे विभाजन होऊन सामाजिक प्रगती खुंटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, राज्य सरकारने स्थापन केलेल्या माजी न्यायाधीश अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता हरकती मागविल्याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अहवालात चुकीची आकडेवारी असण्याची शक्यता असल्याने तो तातडीने जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी करण्यात आली.

या बैठकीस अनिल कुवर, प्रा. देवेंद्र निकम, भरत नगराळे, संजय खंदारे, सुरेंद्र कुवर, प्रशांत निकुंभ, राजेंद्र गुलाले, किरण मोहिते, नरेंद्र महिरे, अॅड. दिनेश महिरे, चंद्रकांत रायसिंग, डॉ. गौतम कुवर, विष्णू जोंधळे, संजय निकुंबे, छोटू कुवर, शांतीलाल महिरे, नरेंद्र कुवर, प्रा. नेत्रदीपक कुवर यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

रायगडच्या माणगावमध्ये खळबळ; लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, आरोपी फरार

Next Post

कलावंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अकोले येथे ५०० लोककलावंतांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
कलावंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अकोले येथे ५०० लोककलावंतांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी निवेदन

कलावंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अकोले येथे ५०० लोककलावंतांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी निवेदन

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In