• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कलावंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अकोले येथे ५०० लोककलावंतांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
कलावंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ अकोले येथे ५०० लोककलावंतांचे आंदोलन; विविध मागण्यांसाठी निवेदन
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

अकोले (प्रतिनिधी) – संगमनेर व पारनेर तालुक्यात लोककलावंतांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी अकोले येथे सुमारे ५०० लोककलावंतांचे आंदोलन होणार आहे. ‘लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेच्या वतीने तहसीलदार, प्रांताधिकारी, डीवायएसपी तसेच पोलिस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात वाजंत्री, तमाशा, आदिवासी नृत्य, जागरण-गोंधळ, पारंपरिक नृत्य अशा विविध कला प्रकारांतील कलाकार मोठ्या संख्येने सहभागी होणार असून महिला कलावंतांचाही लक्षणीय सहभाग असणार आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्राची लोककला ही सांस्कृतिक परंपरेची जपणूक करणारी असून ग्रामीण भागातील कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत समाजप्रबोधनही करतात. मात्र, काही ठिकाणी कलावंतांवर होणारे हल्ले, त्रास व अपमानास्पद वागणूक यामुळे ते भयभीत झाले असून या प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कलावंतांना प्रत्येक कार्यक्रमस्थळी पोलीस संरक्षण द्यावे, शासनाच्या योजनांमध्ये ग्रामीण कलावंतांना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कलावंतांसाठी मोफत विमा, प्रवास सवलत, आरोग्य सुविधा, मुलांचे मोफत शिक्षण, तसेच सांस्कृतिक भवन उभारणी यांसारख्या ११ महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश आहे.

तसेच शासनाच्या योजनांमध्ये केवळ निवडक कलावंतांनाच लाभ मिळत असल्याचा आरोप करत, तळागाळातील ग्रामीण कलाकारांना न्याय देण्याची मागणी संघटनेने केली आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करूनही मागण्यांची केवळ तात्पुरती दखल घेतली गेल्याचे सांगत, यावेळीही मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनात विविध तमाशा मंडळांचे प्रतिनिधी आणि कलावंत उपस्थित राहणार असून, कलावंतांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांसाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Previous Post

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात शहाद्यात एल्गार; ‘आरक्षण संपविण्याचे षडयंत्र’ असा आरोप

Next Post

अनुसूचित जाती पोटवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post

अनुसूचित जाती पोटवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये आंबेडकरी संघटना आक्रमक; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In