• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या
0
SHARES
87
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) : शहरात बनावट कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन माधवराव महाजन (वय ४१, रा. माळीवाडा) हे धुळे-जळगाव चौपदरी महामार्गालगत हिमालय पेट्रोल पंपाजवळ चहा व थंडपेय विक्रीचा व्यवसाय करतात. दि. २० एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या पाच जणांनी स्वतःला अन्न भेसळ विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत तपासणी सुरू केली. किशोर हिम्मतराव बाविस्कर असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने गुटखा विक्रीचा आरोप करत कारवाईची धमकी दिली.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

तपासणीदरम्यान काहीही आढळून न आल्यावर संबंधितांनी स्वतः आणलेला गुटखा दुकानात सापडल्याचा बनाव केल्याचा आरोप आहे. यानंतर “गुन्हा दाखल करू” अशी धमकी देत प्रकरण मिटवण्यासाठी ₹१० हजारांची मागणी करण्यात आली. उपस्थित नगरसेवक मयूर महाजन, रुपेश महाजन व अतुल मराठे यांच्या समक्ष महाजन यांनी उसनवार पैसे घेऊन आरोपींना रक्कम दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे घेतल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी आमदार अमोल पाटील स्वतः एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र गुन्हा नोंदवण्यास विलंब होत असल्याने त्यांना तब्बल चार तास पोलीस ठाण्यात थांबावे लागले. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना त्यांनी, “जर लोकप्रतिनिधीलाच इतका वेळ थांबावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल?” असा सवाल उपस्थित केला.

सदर प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बनावट अधिकाऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा प्रकारांवर तातडीने आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Previous Post

पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Next Post

दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
1
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In