• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
दर्यापूर तहसील कार्यालय ठप्प; महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

दर्यापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी व अधिकारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्याने प्रशासनाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, आवश्यक कामे खोळंबल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात दर्यापूर तसेच अमरावती जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे तातडीने भरणे, वेतनवाढ करणे तसेच वाढलेला कामाचा ताण कमी करणे या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या संपामुळे तहसील कार्यालयातील सर्व कामकाजावर परिणाम झाला आहे. जात, उत्पन्न, अधिवास (डोमिसाईल) यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळणे बंद झाले आहे. तसेच ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आणि जमिनीशी संबंधित सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. विविध शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि इतर लाभार्थी अडचणीत सापडले आहेत.

दरम्यान, तहसील कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रशासन आणि संघटनांमध्ये तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Dipak Meshram
Previous Post

एरंडोलात बनावट अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; चहा विक्रेत्याकडून ₹१० हजारांची खंडणी, आमदार अमोल पाटील चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या

Next Post

ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
9
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त

ठाण्यात बेमुदत संपाचा फटका; शासकीय कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In