• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
आजऱ्यात २ मे रोजी ‘लोकशाहीर गव्हाणकर पुरस्कार’ वितरण; संभाजी भगत यांना यंदाचा मान
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : येथील ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार, २ मे २०२६ रोजी उत्साहात पार पडणार असून, हा मानाचा पुरस्कार यंदा ख्यातनाम लोकशाहीर संभाजी भगत यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते दिला जाणार असून, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ही माहिती पुरस्कार व स्मारक समितीचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अलीकडेच पार पडलेल्या ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार समिती’च्या बैठकीत यंदाच्या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली. श्रमिकांच्या प्रश्नांवर आपल्या शाहिरीतून प्रभावी आवाज उठवणाऱ्या संभाजी भगत यांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे केला जाणार आहे.

RelatedPosts

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

डॉ. भालचंद्र कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे केंद्रीय नेते असून महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या राज्यांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. विद्यार्थी जीवनापासूनच डाव्या चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. कांगो यांनी आपले आयुष्य कामगार, शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हक्कांसाठी समर्पित केले आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणे औचित्यपूर्ण मानले जात आहे.

दरम्यान, लोकशाहीर गव्हाणकर यांच्या स्मारक उभारणीसाठीही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी गव्हाणकर यांच्या गावी स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने समितीने त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

याच बैठकीत ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समिती’ची अधिकृत नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेला मुकुंददादा देसाई, सुधीरभाऊ देसाई, सुनील पाटील, डॉ. प्रा. नवनाथ शिंदे, मीना मंगळूरकर, युवराज पवार, संजय तर्डेकर, पुष्पलता घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाडगे, रणजित कालेकर, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

कळंबोली येथे श्री साईबाबा मंदिराचा ३० वा वर्धापन दिन भक्तिमय वातावरणात संपन्न

Next Post

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात

Related Posts

ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
3
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
1
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
7
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
ताज्या घडामोडी

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 19, 2026
140
ताज्या घडामोडी

NEET 2026 मध्ये धारासूरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; गुणवंतांचा २२ जुलै रोजी सत्कार

July 19, 2026
104
Next Post
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंती व ग्रंथप्रदर्शन उत्साहात

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In