• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

पनवेल/कळंबोली, दि. २३ — पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची अभिनव संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. यावर शाश्वत आणि आधुनिक उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रणाली प्रभावी ठरू शकते, असे सायली सरक यांनी सांगितले.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

या संदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकल्पाबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवून पनवेलमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली असल्याची माहिती देण्यात आली.

तसेच, नगरसेविका सरक यांनी महापौर नितीन पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनाही या प्रकल्पासंदर्भात निवेदन दिले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, महापालिकेमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानंतर पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून संकेत देण्यात आले आहेत.

दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई

Next Post

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In