• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात पनवेल महापालिकेची धडक कारवाई; अनधिकृत नर्सरी व विक्रेत्यांवर कारवाई
0
SHARES
49
VIEWS
Ad 1

पनवेल/कामोठे, दि. २३ — पनवेल महापालिकेच्या कामोठे प्रभाग समिती ‘क’ मार्फत मंगळवार आणि बुधवारी अनधिकृत अतिक्रमण व फेरीवाल्यांविरोधात व्यापक धडक कारवाई करण्यात आली. आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विविध ठिकाणांवरील अनधिकृत स्टॉल, नर्सरी, फेरीवाले आणि हातगाड्यांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले, तर काही ठिकाणी झोपड्याही हटविण्यात आल्या.

महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व प्रभागांमध्ये अतिक्रमण हटविण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कामोठे सेक्टर १९ मधील मारुती स्वीट व चेतक स्वीट परिसरात अनधिकृत स्टॉलवर कारवाई करत सिलेंडर, शेगडी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सेक्टर ७ येथील एमएनआर स्कूल चौकात अनधिकृत फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

RelatedPosts

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

कामोठे पोलीस स्टेशनसमोरही फेरीवाल्यांवर कारवाई करत त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने आणि प्रभाग अधीक्षक दशरथ भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सेक्टर १९, २५, अक्षर बिल्डिंग परिसर, खान्देश्वर स्टेशन, सेक्टर २१ आणि सेक्टर ३४ येथे अनधिकृत व विनापरवाना नर्सरींवर कारवाई करण्यात आली. संबंधित झोपड्या तोडण्यात आल्या.

खान्देश्वर स्टेशन परिसरातही अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सेक्टर २१ येथे दोन नर्सरींसह भंगार व सायकल विक्रेत्यांच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात आली, तर सेक्टर ३४ येथे अनधिकृत हातगाड्या हटविण्यात आल्या. नीलकंठ स्वीट परिसरातही अनधिकृत नारळ विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

महापालिकेने अनधिकृत व्यवसायांवर कठोर भूमिका घेतली असून यापुढेही अशा प्रकारच्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

समाजसेविका सौ स्नेहल ताई बागल या “क्रांतिज्योती महिला प्रेरणा सन्मान-२०२६” पुरस्काराने सन्मानित.

Next Post

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे

Related Posts

Blog

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026
4
Blog

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026
15
Blog

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026
18
Blog

कन्नड पंचायत समिती कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

July 22, 2026
5
वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
Blog

वैध वैद्यकीय पदवी नसताना उपचार केल्याचा आरोप; मुंगसापूरचे मुक्तानंद गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

July 22, 2026
10
Blog

नेताजी सुभाष विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप

July 22, 2026
1
Next Post
पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे

ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

July 22, 2026

दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैला वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद; मानवत बंदचे आवाहन

July 22, 2026

शेतकऱ्यांचा खत पेरणीसाठी ‘देशी जुगाड’; रिकाम्या खताच्या पिशवीपासून बनवली खतपेरणीची ओटी

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In