• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in Blog
0
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांचा संताप वाढला
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

ता. प्रतिनिधी (दि. २०):
मुरूम, बेळंब, कंटेकुर, कोथळी, केसर जवळगा आणि आलूर या गावांतील शेतकरी सध्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहेत. शेतीसाठी दिला जाणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्यामुळे विद्युत पंप सुरळीत चालत नाहीत. परिणामी पिकांना वेळेवर पाणी मिळत नसून मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल्स आणि स्टार्टर जळण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत असून त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

RelatedPosts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

सध्या उष्णतेची लाट तीव्र असून तापमान उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत पिकांना नियमित पाणी मिळणे अत्यावश्यक असताना वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने शेती संकटात सापडली आहे.

या समस्येकडे महावितरण (MSEDCL) विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नाराजी वाढत आहे.

दरम्यान, वीजपुरवठा तात्काळ सुरळीत न झाल्यास सर्व गावांतील शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous Post

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; “पॉड टॅक्सी” प्रकल्पाची संकल्पना पुढे

Next Post

समता चळवळीतील झुंजार नेतृत्व चक्रधर दादा उगले अनंतात विलीन; अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर

Related Posts

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत
Blog

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
21
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.
Blog

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026
10
Blog

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026
5
पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!
Blog

पोळा सणावर दुष्काळाचे सावट; बळीराजाची चिंता वाढली!

September 5, 2026
20
श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण
Blog

श्रमदानातून चेथर ग्रामसभेचा अनोखा उपक्रम lCFR क्षेत्राला निवडुंगाच्या थोंब्यांचे जैविक कुंपण

September 5, 2026
6
व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष
Blog

व्हाॅलंटरी विद्यालयात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; चिमुकल्यांच्या नृत्यापासून थरारक दहीहंडीपर्यंत जल्लोष

September 5, 2026
100
Next Post
समता चळवळीतील झुंजार नेतृत्व चक्रधर दादा उगले अनंतात विलीन; अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर

समता चळवळीतील झुंजार नेतृत्व चक्रधर दादा उगले अनंतात विलीन; अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In